◻ सोमवारी पानोडी - शिबलापूर रस्त्यावर झाला होता अपघात
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं लौकी अजमपूर येथिल अशोक सखाराम गिते उर्फ फिटर (अंदाजे वय - ४५) यांचे सोमवारी दुपारी पानोडी - शिबलापूर रस्त्यावर झालेल्या अपघातात निधन झाल्यामुळे आश्वी पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अशोक गिते उर्फ फिटर यांचा पानोडी - शिबलापूर रस्त्यावर दुपारच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे अपघात झाला होता. त्यानंतर त्याना संगमनेर येथिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचे निधन झाले.
अशोक गिते हे आश्वीसह पंचक्रोशीत मोटार रिवायडींग तसेच इतर इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक कामासाठी प्रसिद्ध होते. कपालेश्वर इलेक्ट्रिकचे ते मालक होते. हस्तमुख व मनमोकळा स्वभाव असल्याने त्यानी मोठा मित्र परिवार मिळवला होता. त्याच्या अकस्मात निधनाची बातमी मिळताचं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान अशोक गिते याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ असा मोठा परिवार असून येथिल अनिल गिते (फिटर) यांचे ते बंधू होते. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिव देहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी ग्रामस्थं, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.