◻ मालुंजे येथिल रहिवासी ; पंचक्रोशीत हळहळ
संगमनेर Live | नाशिक पुणे महामार्गावर नाशिक येथे झालेल्या अपघातात संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथिल रहिवासी असलेल्या विठ्ठल दादा घुगे व सुनिता विठ्ठल घुगे या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली असून त्यामुळे मालुंजेसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत स्थानिक नागरीकानी दिलेली माहिती अशी की, विठ्ठल घुगे हे कामानिमित्त कुटुंबियासमवेत नाशिक येथे राहत होते. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील दत्त मंदिर चौकालगत दोघे पती पत्नी दुचाकीवरुन चालले होते. यावेळी मागुन आलेल्या अज्ञात वाहणाने त्याच्यां दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेला अपघात इतका भिषण होता की, दोघा पती पत्नीचा यामध्ये जागीचं मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान घुगे पती पत्नीच्या पश्चात दोन मुलीसह मोठा परिवार असल्याची माहिती मिळाली असून मालुंजे (ता. संगमनेर) या त्याच्यां मुळगावी रात्री उशीरा अंत्यसंस्कार होणार आहेत.