◻ १ कोटी रुपये खर्चून ऐतिहासिक मंदिराचा भव्य दिव्य जिर्णोध्दार अतिम टप्यात
◻ प्रभु श्रीराम, माता सीता आदि मुर्तीची होणार लवकरच विधिवत प्राणप्रतिष्ठा
संगमनेर Live | शिर्डी मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील सहकाराची पार्श्वभूमी लाभलेल्या आश्वी बुद्रुक येथील पुरातन तसेच ऐतिहासिक अशा प्रभु श्रीराम मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यत मंदिर जिर्णोद्धाराठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च झाल्याचे मंदिराच्या भव्यतेतून स्पष्ट होत असून या मंदिरामुळे आश्वीच्या वैभवात मोठी भर पडणार असल्याने श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थासह भाविकानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आश्वी बुद्रुक येथे सुमारे दिडशे वर्षापुर्वीचे पुरातन असे प्रभु श्रीराम, माता सीता, बंधु लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांचे संयुक्त उत्तर मुखी अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे. तसेच या मंदिरासमोर दक्षिणमुखी मारुती मंदिर तसेच विविध धर्मियाची श्रध्दास्थाने असल्याने परिसरात नेहमी वर्दळ असल्याने या परिसरात भक्तीचे वातावरण पहावयास मिळत असते.
या श्रीराम मंदिराची दुरावस्था व जिर्णोध्दार कामाबाबत सविस्तर वृत्त वेळोवेळी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ४ वर्षापुर्वी रविवार दि. २५ मार्च रोजी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमानतंर रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी प्रभु श्रीराम मंदिर जिर्णोध्दारचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी प्रभु श्रीरामाचा जीवनपट उपस्थित भाविक व ग्रामस्थानसमोर मांडताना तो आपल्याला कसा मार्गदर्शक आहे हे उदाहरणासह समाजावून सांगितला. त्यामुळे याप्रसंगी मंदिर जिर्णोध्दाराचा संकल्प ग्रामस्थाकडून हाती घेण्यात आला होता.
त्यामुळे ग्रामस्थाच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमतीलाल गांधी, सरपंच महेश गायकवाड, उप सरपंच राहुल जऱ्हाड तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थानी प्रत्यक्ष या मंदिर जिर्णोद्धाराचे भुमीपुजन करुन कामाला प्रत्यक्ष सुरवात केली. त्यामुळे आतापर्यत सुमारे १ कोटी रुपये खर्च करून भव्य व दिमाखदार मंदिर उभे राहिले असून पुर्णत्वाकडे जात आहे.
दरम्यान या मंदिरात प्रभु श्रीराम, माता सीता, जैन धर्मियाचे २३ तीर्थकर पार्श्वनाथ प्रभु, बालाजी भगवान, साईबाबा, नरहरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोंदवलेकर महाराज, गणपती, राधाकृष्ण यांच्या मुर्ती आसणार आहेत. तसेचं समोर दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर निर्माण करण्यात आले असून या दोन्ही मंदिरामुळे आश्वी बुद्रुकच्या वैभवात भर पडणार असल्याने श्रीराम नवमीच्या पुर्वसंध्येला आश्वी बुद्रुक सह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण होते.
राजस्थान येथिल जयपूर येथून नुकत्याचं प्रभु श्रीराम, माता सीता, बंधु लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, जैन धर्मियाचे २३ तीर्थकर पार्श्वनाथ प्रभु, बालाजी भगवान, साईबाबा, नरहरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोंदवलेकर महाराज, गणपती, राधाकृष्ण याच्या मुर्त्या आणण्यात आल्या आहेत. रामेश्वर मठाचे महंत दत्तंगिरी महाराज यांच्या हस्तें या मुर्त्याचे ग्रामस्थानी विधिवत स्वागंत केले असून लवकरचं जिर्णोध्दार केलेल्या मंदिरात त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.