◻ पुणतांबा ग्रामपंचायतीने विकसीत केलेल्या विविध विकास कामांचे आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण
संगमनेर Live | बांधावर जावून ज्यांनी शेकतकऱ्यांना मदतीच्या मदतीची आश्वासनं दिले, त्यांनीच आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. सरकारचे धोरण फक्त बिल्डरधार्जीणे आहे. सरकार सत्तेतील आमदारांनाच निधी देत नाही तर शेतकऱ्यांच्या योजनांना केव्हा देणार.? असा प्रश्न उपस्थित करुन, लसिकरणाचा वाचलेला पैसा मदत म्हणून शेतकऱ्यांन द्या अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
पुणतांबा ग्रामपंचायतीने विकसीत केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. भास्करराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सरपंच डॉ. धनंजय धनवटे, जिल्हा परिषद सदस्य शाम माळी, उपसरपंच महेश चव्हाण, पंचायत समिती सदस्या सुवर्णा तेलोरे, गणेश कारखान्याचे संचालक राजेंद्र थोरात, सुभाषराव कुलकर्णी, यशवंतराव चौधरी, शुक्लेश्वर वहाडणे, सौ. संगिता भोरकडे, अँड. चांगदेव धनवटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात पुणतांबा येथील असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यासर्वांचे आ. विखे पाटील यांनी सत्कार करुन पक्षामध्ये स्वागत केले.
महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी सरकार दोन वर्षे घरात बसले. माझे कुटूंब माझी जबाबदारी म्हणणारे मंत्री स्वत:च्या कुटूंबाच्या कुटूंबाची काळजी घेत बसल्याने जनतेला सुध्दा माझा जीव माझी जबाबदारी असे म्हणण्याची वेळ आली असा टोला लगावून कोव्हीड संकटात कर्तव्य बजावण्यात महाविकास आघाडी सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे आत्मनिर्भरतेने देश पुन्हा उभारी घेवून वाटचाल करीत असल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील यांनी सांगितले की, देशातील १८० कोटी लोकांचे लसिकरण मोफत पुर्ण करुन, विश्वविक्रम करतानाच ८० कोटी लोकांना मोफत धान्य देवून देशातील उपासमारी टाळली. २० लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर करुन, समाजातील सर्वच घटकांना मदतीचा हात देण्याचे काम मोदीजींनी केल्यामुळेच ते आज विश्वनेता झाले असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार हे जनतेचा विश्वासघात करुन, सत्तेवर आले आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेने सर्व तत्व गुंडळाली आहेत. राष्ट्रवादीला कोणतेही तत्वच राहीलेले नाही. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या या तीनही पक्षांना जनतेचे कोणतेही देणेघेणे राहीलेले नाही. अडीच वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार राज्याच्या किंवा जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेवू शकलेले नाही असा थेट आरोप करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, सरकार फक्त बिल्डरांना मदत करते, विदेशी दारुवरील कर माफ करते मात्र अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत करीत नाही.
आज राज्यात निधीअभावी कृषी योजना ठप्प झाल्या आहेत, कृषी विकासाचा कार्यक्रम पुर्णपणे थांबला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून होत नाही. यापूर्वी बांधावर जावून मदतीच्या वल्गना करणारेच आता शेतकऱ्यांना कवडीचीही मदत करायला तयार नाहीत. नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या घोषणा आत्तापर्यंत तीनवेळा झाल्या पण हे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकलेले नाही.
केंद्राने मोफत लस दिल्यामुळे राज्य सरकारचे ६ हजार कोटी रुपये वाचले आहेत. हा पैसा शेतकऱ्यांना मदत म्हणून द्या अशी मागणी करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच वेगवेगळे मुद्दे महाविकास आघाडी सरकारकडून उपस्थित केले जात आहेत.
सत्तेतील आमदारांमध्येच आता निधीवरुन वाद सुरु झाले आहेत. जिथे आमदारांनाच काही मिळेना तिथे शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करुन, या राज्यात हनुमान चालीसा म्हणाणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल होतात मात्र औरंगजेबाच्या कबरीवर जावून फुले वाहणाऱ्यांविरुध्द महाविकास आघाडी सरकार कोणतीही कारवाई करत नाही हे दुर्दैव असल्याचे मत आ. विखे पाटील यांनी शेवटी व्यक्त केले.