◻ गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने निधी असूनही विकास कामे खंडीत
◻ ग्रामस्थाना कागदपत्रे मिळवण्यासाठी मारावे लागतायत हेलपाटे
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील प्रतिष्ठीत अशा उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीचे उप सरपंच नानासाहेब सुखदेव उंबरकर यानी गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे निधी असूनही विकास कामे करण्यात अडथळे येत असलल्याने संगमनेर चे गटविकास अधिकारी यानी गावासाठी पुर्णवेळ ग्रामविस्तार अधिकारी नेमावा अन्यथा पदाचा राजीनामा देऊन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उंबरी बाळापूर गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे गावातील ग्रामस्थं व नागरीकाची मोठी अडवणूक होत असून शासकीय दाखले, इतर कामासाठी आवश्यक कागदपत्रे व उतारे मिळवण्यासाठी नागरीकाना हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाचा सामना आम्हा पदाधिकारी याना करावा लागत आहे.
पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे अनेक विकास कामे खंडीत असून अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे. ग्रामपंचायत मध्ये लिपिकाची जागा रिक्त असल्याने पदाधिकारी यानाचं कामे करावी लागत आहे. गावासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असताना पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे विकास कामे खंडीत झाली आहे. त्यामुळे गावातील विकासकामे करण्याची इच्छा असूनही आम्हाला विकासकामे करताना अडचणी येत आहेत.
त्यामुळे गावातील नागरीकाच्या विविध समस्या व विकास कामातील अडथळे दूर करण्यासाठी गावासाठी ५ जुलै २०२२ पर्यत पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा. अन्यथा मी उप सरपंच पदाचा राजीनामा देऊन पंचायत समितीसमोर अंदोलन करील. असा इशारा निवेदनाद्वारे उप सरपंच नानासाहेब उंबरकर यानी दिला आहे.