◻ आरोपी पती पोलीसाच्या ताब्यात ; तिघानवर गुन्हा दाखल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल शिवाणी दिपक जोशी (वय - २४) या विवाहित महिलेला तिचा पती, सासू व एका महिलेने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्नं केल्याबद्दल आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत या महिलेने पोलीसाना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझे पती व एका महिलेचे प्रेमसंबध असून ते लोणी येथे खोली घेऊन राहत असल्याची माहिती मला मिळाली होती. दि. ८ जुलै रोजी मी दुपारच्या सुमारास त्याठिकाणी त्या दोघाना ही एकत्र धरल्यामुळे आमच्यात मोठा वाद झाला.
त्यामुळे पती, सासू व ती महिला हे संध्याकाळी दाढ खुर्द याठिकाणी आले. ‘तु मला लागत नाही, तू निघून जा, मला या महिलेशी लग्न करायचे असून आमच्यात अडसर करु नको असे पती म्हणाला. मी या गोष्टीला विरोध केला असता पती व त्या महिलेने मला खाली पाडले. यावेळी मी ओरडू लागल्याने सासूने मला दाबून धरले व त्या महिलेने माझे दोन्ही हात धरले होते. यावेळी पतीने गोठ्यातून गोचिंडाचे औषध आणून ‘आज शिवाणीचा विषय संपवून टाकायचा’ असे म्हणत मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने औषध पाजले. असा जबाब लोणी येथे रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या शिवाणी दिपक जोशी यांनी पोलिसांना दिला आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नबंर १२९/२०२२ नुसार भादंवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपी दिपक जोशी सह दोन महिलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु असून आरोपी पतीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.