◻ नगर जिल्ह्यातून अग्निवीर सैन्य भरतीला होणार सुरवात
◻ अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील तरुणाना संधी
संगमनेर Live | पुणे येथिल सैन्य भरती मुख्यालय कार्यालयामार्फत २२ ऑगस्टं ते ११ सप्टेंबर २०२२ या कलावधीत अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे व सोलापूर सहा जिल्ह्यातील नवयुवकासाठी सैन्य भरती मेळावा राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्हयातील पात्र उमेदवारांनी www.joinindainarmy.niv.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी दिनांक १ जुलै २०२२ पासून ३० जुलै २०२२ पर्यंत करावी. अग्निवीर जनरल डयुटी, अग्निवीर टेक्नीकल, अग्निवीर क्लार्क, स्टोर किपर व अग्निवीर ट्रेडमॅन या पदांसाठी सैन्य भरती घेण्यात आहे.
दरम्यान जिल्हयातील भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी वर नमुद संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यात सहभाग नोंदवून या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण, अधिकारी अहमदनगर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.