◻ सत्यजित तांबे यांची तरुण पिढीला भावनिक साद
संगमनेर Live | हिरवाईने नटलेली सृष्टी ही प्रत्येकाच्या आवडीची असते. सध्या पावसाळ्यामुळे सर्वत्र छान वातावरण झाले असल्याने अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडतात, अशा वेळी अनावधाने सेल्फी काढताना किंवा अति उत्साहपणाने मोठा धोका होऊ शकतो. म्हणून पावसाळ्याचा व हिरवाईचा आनंद घ्या, पण याचबरोबर स्वतःची काळजी घ्या असे आवाहन युवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व युवा नेते सत्यजित तांबे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील व राज्यातील तरुणांना आवाहन करताना सत्यजित तांबे म्हणाले की, पावसाळ्यामुळे सर्वसृष्टी हिरवी झाली आहे .त्यामुळे अनेक तरुण हे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतात. त्यात काही वावगे नाही. निसर्गाचा आनंद घेतलाच पाहिजे. परंतु अशा ठिकाणी अति उत्साहाने किंवा अनावधानाने काही दुर्घटना घडतात यामुळे स्वतःच्या जीवाला मोठा धोका होऊ शकतो आणि त्यातूनच त्याचे परिणाम कुटुंबालाही भोगावे लागतात .
म्हणून सर्वच नागरिक व तरुणांनी फिरायला गेल्यानंतर निसर्ग, डोंगर, दर्या, झरे, धबधबे, घाट यांचे सौंदर्य अनुभवताना किंवा प्रवासादरमानही स्वतःच्या जीवाला काही इजा होणार नाही यासाठी काळजी घ्या. स्वतःचा सोबत असणाऱ्या सर्वांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची काटेकोरपणे काळजी घेतली तर आपण धोका टाळू शकतो.
शक्यतो धोकादायक ठिकाणी सहली किंवा ट्रेक आयोजित करणे टाळा. आपले घरी आपले आई-वडील कुटुंबीय वाट बघत असतात हे नेहमी लक्षात असू द्या अशी भावनिक साद ही सत्यजित तांबे यांनी तरुण पिढीला घातली आहे.