◻ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साधला वारकऱ्यांशी थेट संवाद
◻ वैष्णव सदनामध्ये राज्यातील विविध भागांमधून आलेल्या ३३ पेक्षा अधिक दिंड्यांचा मुक्काम
संगमनेर Live | वारकरी सांप्रदायाशी असलेला ऋणानूबंध विखे पाटील परिवारातील चौथ्या पिढीनेही जपल्याचा प्रत्यय पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना आला. आषाडी एकादशीच्या निमित्ताने जमलेल्या वारकऱ्यांशी थेट संवाद साधून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यवस्थेचा प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्येही दाखवून दिला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने येतात. या वारकऱ़्यांना सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून विखे पाटील परिवाराने स्व. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या माध्यमातून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती वैष्णव सदन पंढरपूर येथे उभारले आहे. या सदनामध्ये वारकऱ्यांची निवासा बरोबरच सर्व व्यवस्था ठेवली जाते. या सुविधेचा लाभ वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे होत असल्याचा प्रत्येय वारीच्या निमित्ताने आला.
विखे पाटील वैष्णव सदनामध्ये राज्यातील विविध भागांमधून आलेल्या ३३ पेक्षा अधिक दिंड्यांमधील वारकरी या ठिकाणी थांबलेल्या आहेत. भजन, किर्तन आणि अध्यात्माचा आनंद घेवून आषाढीवारी करीत आहेत. या सर्व वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील दोन दिवसांपासून पंढरपुरमध्ये होते. वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी येथील व्यवस्थेची पाहाणी केली.
अनेक वारकऱ्यांनी डॉ. विखे पाटील यांच्या आपुलकीचे कौतूक करुन, विखे पाटील परिवार वारकऱ्यांप्रती देत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंदिरात जावून पांडुरंगाचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने खासदार विखे पाटील यांचा सत्कार अध्यक्ष गहीनीनाथ महाराज यांनी केला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. सुहास देशमुख, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी पंढरपूर मध्ये भक्त निवास असावे ही आदरणीय खासदार साहेबांची खुप इच्छा होती. दोन वर्षापुर्वी हे सदन वारकऱ्यांसाठी विखे पाटील परिवाराने समर्पित केले आहे. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना या सदनाचा आश्रय मिळावा हीच भुमिका यामागे होती. वारकऱ्यांप्रती अशा प्रकारे सेवा करण्याची आम्हाला मिळालेली संधी ही खुप मोठी आहे.
आ. राधाकृष्ण विखे पाटील