इतिहासाने नोंद न घेतलेला.. स्वातंत्र्य संग्रामातील दुर्लक्षित योध्दा.!
कै. निवृत्ती सबाजी पाटील इलग
संगमनेर Live | बुद्धीला व मनाला पटलेल्या एका स्वातंत्र्याच्या कल्पनेने झपाटलेले व भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात दुर्लक्षित असले तरी त्यांनी परिस्थितीशी दोन हात करण्यात पुरुषार्थ मानला व तो सिद्ध केला. असे कै. निवृत्ती सबाजी पाटील इलग हे प्रतापपूर (ता. संगमनेर) गावचे रहिवासी होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण या महान आत्म्यास गमावले असून बुधवार दि. ३१ ऑगस्टं २०२२ रोजी होणाऱ्या दशक्रिया विधीनिमित्त ‘आप्पा’ च्या महान कार्याचे इतिहासाने गाळलेले पान आपणांस माहित व्हावे यासाठी तसेचं त्याच्यां पवित्र स्मृतीला वंदन करण्यासाठी हा लेख प्रपंच.!
कै. निवृत्ती सबाजी पाटील इलग याचां जन्म स्वातंत्र्य पुर्व काळात म्हणजे १९३३ साली अमृतवाहिनी असलेल्या प्रवरानदी तिरावरील प्रतापपूर (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) सारख्या छोट्याशा खेडेगावात वडील सबाजी पाटील इलग व आई लक्ष्मीबाई याच्यां पोटी झाला होता. त्याना बंधु शंकरराव व गणपतराव तसेच भगिनी भागुबाई ही भावंडे होती. कै. निवृत्ती पाटील इलग यांचे जुनी ७ वी पर्यतचे शिक्षण चिचंपूर व आश्वी येथे झाले. लहानपणापासूनचं धाडसी व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते.
तो काळ पारतंत्र्याचा होता. ब्रिटिशांच्या अन्याय अत्याचाराविरुध्द भारतीयानमध्ये मोठा रोष होता. त्याचंकाळात क्रांतिसिंह नाना पाटील याच्यांकडून प्रेरणा घेत बालवयातचं कै. निवृत्ती पाटील इलग यानी खळी (ता. संगमनेर) येथे शिकारीच्या डोगंरावर सवगड्यासह ‘जंगल सत्याग्रह’ करुन इग्रंजाच्या जुलमी कायद्याला विरोध दर्शवण्याचे धाडस दाखवले होते. सातत्याने त्यानी जुलमी ब्रिटिश राजवटीला विरोध दर्शवला मात्र स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाने मात्र त्याची नोदं न घेतल्याची खंत अनेकांनी बोलुन दाखवली आहे.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानतंर मुबंई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री व आश्वीचे नातु असलेले बाळासाहेब खेर याच्यां मदतीने प्रतापपूर गावच्या विकासाचा ध्यास कै. निवृत्ती पाटील इलग यानी घेतला होता. १९५२ साली त्यानी सहकारी सोसायटीची स्थापना केली व संस्थेच्या गोडाऊन उध्दघाटनासाठी पहिले केद्रिंय सहकार मंत्री एस. के. डे याच्यांसह सहकाराचे जनक असलेले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, बाबासाहेब भारदे व बी. जे. खताळ पाटील यांना प्रतापपूर गावात आणण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले होते.
त्यानी गावासाठी ग्रामपंचायत, दूध संस्था व पाणी पुरवठा योजना निर्माण करत गावच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली. प्रतापपूर सहकारी सोसायटीचे संस्थापक चेअरमन व ग्रामपंचायतीचे १० वर्ष सरपंच म्हणून काम करत असताना गावाला प्रगतीच्या वेगवान रथावर आरुढ केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
संगमनेर सहकारी ऑईल मिलच्या उभारणीच्या निमित्ताने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, दुर्वे नाना, अँड. ए. बी. जोर्वेकर, बी. जे. खताळ पाटील, निमगावजाळीचे सुपुत्र सखाराम शेठ जोधंळे, के. बी. रोहमारे, प्रल्हादसा क्षत्रिय, मोतीभाऊ फिरोदिया, गजानन पाटील खर्डे, सुर्यभान पाटील तांबे याच्यांशी कै. निवृत्ती पाटील इलग याचां जवळून संबंध आल्याने भविष्यातील विकास दृष्टी आणखी प्रगल्भ होण्यास मोठी मदत मिळाली होती.
पुढे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदंस्य झाल्यानतंर संभाजीराजे थोरात, वसंतराव देशमुख व अँड. बापुसाहेब गुळवे याच्यांशी त्याचे ऋणानुबंध अधिक गडद झाल्याचे त्याच्या पुढील पिढ्यातही पाहवयास मिळत आहे. तर संगमनेर साखर कारखाना, जिल्हा सहकारी बँक उभारणीतही त्यानी योगदान दिले असून संगमनेर महाविद्यालयाच्या स्थापनेत ओकांरशेठ मालपाणी याच्यां खांद्याला खांदा लावून काम केले होते.
गाव विकासासाठी कै. निवृत्ती पाटील इलग हे सर्वस्व झोकून काम करत असताना मारुती बाप्पा गायकवाड, एकनाथ पाटील जऱ्हाड, शंकरराव भुसाळ, नारायणराव उंबरकर, बाबुराव फड, शिवराम फड, लक्ष्मणराव सारबंदे याच्यां साथीने प्रत्येक सार्वजनिक कामात त्यानी आपली कधीही न पुसणारी छाप सोडली आहे.
कै. निवृत्ती पाटील इलग हे आश्वी परिसरात पद्मभुषण खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील याच्यांबरोबर पद्मश्री विखे पाटील साखर कारखाण्यात संचालक म्हणून त्यानी काम केले होते. जिल्हापरिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवानेते खा. सुजय विखे पाटील याच्यांशी त्याचा मोठा स्नेह होता. तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे याच्यांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
भिमाजी आंधळे, नाना आंधळे, आनंदा आंधळे, नारायण आंधळे, विठ्ठोबा आकरावारी, विठ्ठल सावळेराम आंधळे, महादू पाटील आंधळे, अनाजी गिते, बाबुराव महादू आंधळे आदिसह त्याचे व्याही असलेले कै. यादवराव पाटील आंधळे, कै. रामनाथ पाटील फड, कै. म्हतारबा पाटील फड, जगन्नाथ पाटील भाबड यांची कै. निवृत्ती पाटील इलग याना सदैव साथ दिल्यामुळे त्याना हा यशाचा मोठा पल्ला गाठता आल्याची भावना त्यानी सदैव व्यक्त केली.
कै. निवृत्ती पाटील इलग यांचे जेष्ठ चिरंजीव तसेच शिवनेरी उद्योग समुहाचे संस्थापक व विखे पाटील कुटुंबाचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भगवानराव इलग यानी सदैव वडीलाच्या विचाराना आदर्श मानून काम केल्यामुळे उद्योग, राजकारण, समाजकारणात वेगळी उंची निर्माण केली आहे. या समाजसेवेत बंधु सुरेशराव, बाळासाहेब, भगिनी सौ. वच्छलाबाई नागरे, हिराबाई आंधळे व सौ. विजया आंधळे यांची मोलाची साथ लाभत आली असून कै. निवृत्ती पाटील इलग याची पुढील पिढी असलेले त्याचे नातु हे त्याचे समाजसेवेचे कार्य पुढे घेऊन जात असल्याचे यानिमित्ताने जाणीवपूर्वक सांगणे गरजे आहे.
“स्वातंत्र्य म्हणजे मानवता, समता व विश्वबंधुत्व यांचा मिलाफ होय. स्वार्थापलीकडे जाऊन स्वत:बरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचे सुख मिळावे, ही तळमळ कै. निवृत्ती पाटील इलग याच्यां मनात होती. आज स्वार्थ, भ्रष्टाचार, लूट, फसवणूक, मतलबी राजकारण यांचा विळखा स्वातंत्र्याची गळपेची करत असल्याची चर्चा कानावर आल्यास मात्र या स्वातंत्र्याचा उपासक असलेल्या निवृत्ती पाटील इलग याचां जीव कासावीस होत असल्याचे अनेकानी स्वंता:च्या डोळ्यानी पाहिले आहे.
कै. निवृत्ती पाटील इलग हे स्वातंत्र्य संग्रामातील केवळ सैनिक नव्हते तर ते समाजकारण, राजकारण व सहकारातील तत्त्वचिंतक व प्रतिभाशाली व्यक्तीमत्वं होते. गावातील मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, मानमोडे बाबा मंदिर तसेचं आश्वी येथिल खंडोबा मंदिर याचां जिर्णोध्दार करण्यात त्यानी पुढाकार घेतला होता. संत भगवान बाबा, भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्री, रामायनाचार्य ढोक महाराज, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज व उध्दवजी महाराज मंडलिक याच्यांवर त्यांची अपार श्रध्दा होती. चार धाम यात्रा करणारे, धार्मिक, अध्यात्माचा वारसा जोपसणारे व्यासंगही बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाला भावपूर्ण श्रध्दांजली.. आदंराजली.!