◻ जैन धर्मात पर्वाधीराज पर्युषण पर्वाला अनन्यसाधारण महत्त्व
◻ जैन धर्मियांचे सर्वात मोठे पर्व उत्सहात संपन्न
संगमनेर Live | जैन धर्मातील काही महत्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युषण पर्वाचेही एक वेगळे महत्व आहे. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठे पर्व मानले जाते आणि त्यामुळे याला पार्वधिराज असेही म्हटले जाते. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जैन स्वाध्याजी याच्यां उपस्थितीत जैन बांधवानी ‘पर्वाधिराज पर्युषण पर्व’ हे जप, तप, दान व धर्म करत मोठ्या उत्साहात साजरे केले.
२४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व उत्सहात साजरे करण्यात आले. या काळात अहमदनगर येथुन आलेल्या धर्म प्रचारक स्वाध्याजी ज्योतीची चोरडिया, विजयाची मुनोत यांच्या सान्निध्यात पर्युषण पर्व सणाच्या काळात मंगलमय वातावरणात जैन समाज बांधव न्हाहुन गेला.
आपल्या मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व होय. सर्व जैन बांधव या पर्युषण पर्वाच्या काळात मनातील सर्व विकार, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व विकारांवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडतो. हा उत्सव साजरा करणाऱ्या अनुयायानी भगवान महावीरांनी सांगितलेल्या १० नियमांचं पालन करुन पर्युषण पर्व साजरा केला. तसेच यावेळी स्वंत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्यासाठी जप, तप, दान, धार्मिक ग्रंथाचे वाचन व धार्मिक प्रवचन ही केले.
यावेळी आनंद भक्ती मंडळ, आनंद पाठशाळा, कन्या मंडळ यांनी विविध धार्मिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी, ईश्वर भंडारी, वसंत गांधी, प्रकाश मुथ्था, संजय गांधी, चंपालालजी बोरा, नवलमलजी भंडारी, सुमतीलाल रातडीया, दिलीपजी गांधी, योगेश रातडीया, दिलीपजी पटवा, योगेश लुंकड, राजेंद्र लुनिया, जयंत्तीलाल भंडारी, अभिजीत गांधी, अमरचंदजी गांधी, निलेश चोपडा, रोहित भंडारी, अमित भंडारी, प्रशांत गांधी, सतिश गांधी, धनराजजी गांधी, सागर रातडीया, निलेश रातडीया सह जैंन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.