◻️ ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेकडून सभासद हिताचे निर्णय - भगवानराव इलग
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील उत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून नाव लौकीक असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी प्रतापपूर या संस्थेची नुकतीचं जेष्ठ नेते व मार्गदर्शक भगवानराव इलग यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून संस्थेला ६०६५१८ रुपये नफा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रतापपूर सेवा सहकारी सोसायटीत सत्तातंर घडून आल्यामुळे ही संस्था जेष्ठ नेते भगवानराव इलग यांच्या ताब्यात आल्यानतंर सभासद व शेतकरी हिताच्या दृष्टिकोणातून अमुलार्ग बदल करण्यात आले आहेत. मागील १५ वर्षापासून संस्था तोट्यात असल्याने सभासदाना डिव्हिडंड मिळत नव्हता. परंतू सोसायटी संत्तातरानतंर संस्था नफ्यात आणून या वर्षी सभासदाना ५ टक्के डिव्हिडंड वाटपाचा निर्णय नुतन संचालक मंडळाने घेतल्याची माहिती मिळाली आहे. याप्रसंगी अहवाल वाचन करुन विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
तसेच नुतन संचालक मंडळाने स्वखर्चाने १ लाख २५ हजार रुपये इतकी रक्कम खर्चून सेवा सोसायटीचे कार्यालय, इमारत, गोदाम व वॉल कंम्पाऊडला रंग मारल्यामुळे वैभवशाली इमारतीचे देखने रुप सध्या नजरेस पडत असल्याने गावच्या वैभवात मोठी भर पडली आहे. भविष्यात संस्थेच्या सभासदाचा अपघात विमा उतरवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
तर ठराविक सभासद हे थकबाकीदार असल्याने संस्थेच्या नफ्यावर थेट परिणाम होत असल्याने या सभासदानी लवकरात लवकर आपली थकबाकी भरुन संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन गजानन आव्हाड, व्हा. चेअरमन सखाराम आंधळे व उपस्थित संचालक मंडळाने केले आहे. यावेळी सचिव संदीप ऊनवणे, कर्मचारी राजेद्रं वाणी तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.
महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापपूर सेवा सहकारी सोसायटी ही सभासदाच्या हिताचे निर्णय घेत असून येत्या काळात ही संस्था विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणार आहे. तसेचं पुढेही संस्था जास्त - जास्त नफ्यात आणण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न केल्यास सभासदांना चागला लाभांश वाटप करता येऊ शकेल. असा विश्वास जेष्ठ नेते भगवानराव इलग यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला आहे.