◻️ ज्योत आणण्याचे मंडळाचे पाचवे वर्ष
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल अष्टविनायक मित्र मंडळाच्या सदंस्यानी श्री क्षेत्र एकवीरा देवी येथून पायी ज्योत आणली असून ज्योत आश्वी खुर्द हद्दीत दाखल होताचं या ज्योतीचे ग्रामस्थानी जल्लोशात स्वागंत केले.
नवरात्र उत्सवाची सोमवारपासून सुरवात होत असल्याने धार्मिकतेसह साधु संताचे पुजन करणारी भुमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आश्वी खुर्द येथिल अष्टविनायक मित्र मंडळाचे सदंस्य हे रविवारी पहाटेचं श्री क्षेत्र एकवीरा देवी मंदिर तिर्थक्षेत्राकडे निघाले होते. त्यानतंर मंडळाच्या सदंस्यानी एकवीरा देवीचे दर्शन घेऊन विधीवत ज्योत प्रज्वलित करुन आश्वीच्या दिशेने मार्गस्थ झाले.
श्री क्षेत्र एकवीरा देवी ते आश्वी खुर्द असा १८० कि. मी. चा पायी प्रवास अवघ्या १३ तासात पुर्ण करुन सोमवारी दुपारच्या सुमारास अष्टविनायक मित्र मंडळाचे सदंस्य सवाद्य व मंगलमय वातावरणात आश्वी खुर्द हद्दीत दाखल झाले. यावेळी ग्रामस्थानी ज्योतीचे विधीवत पुजन केले असून यावेळी महिला तरुण व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वाना चागले आरोग्य लाभावे यासाठी देवीला प्रार्थना केली आहे.
दरम्यान मंडळाच्या वतीने धर्मिक विधिसह विधीवत घटस्थापना करण्यात आली आहे. पायी ज्योतीचे हे पाचवे वर्ष असून याआधी मंडळाने नेमबाई, कोल्हार, मोहटा व वणी येथून पायी ज्योत आणली असून कोराना संकटामुळे दोन वर्ष वाया गेल्यानतंर या वर्षी नवरात्र उत्सवात भाविकाचा उत्साह दुणावल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.