◻️ हंगेवाडी येथील तरुणाला दंश केल्याने तरुणाची प्रकृत्ती बरी
◻️ शेडगाव येथे दोन ठिकाणी नाग आढळले
संगमनेर Live | मागील अनेक दिवसापासून संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मोठ्यासंख्येने विषारी नाग आढळून येत असल्याने नागरीकानमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. हंगेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका तरुणाला विषारी नागाने दंश केल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु असून एकाचं रात्री शेडगाव येथे दोन व हंगेवाडी येथे विषारी नाग आढळल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सांयकाळी ८ वाजेच्या सुमारास हंगेवाडी येथे सुदर्शन युवराज सांगळे हा तरुण आंधारात पाईपमधील कचरा काढत होता. यावेळी त्या पाईपमध्ये बसलेल्या विषारी नागाने त्याच्या हाताला दंश केला. त्यामुळे तात्काळ त्याला लोणी येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तर संतोष गिते यानी याबाबत सर्पमित्र शिवप्रसाद पवार याला फोन करुन हंगेवाडी येथे नाग असल्याची माहिती दिल्याने शिवप्रसाद पवार याने घटनास्थळी जाऊन हा नाग व्यवस्थित ताब्यात घेतला आहे. तसेच याचं दरम्यान शेडगाव येथे गुलाबराव सांगळे व डॉ. अनिल क्षिरसागर याच्यां घराजवळ नाग असल्याची माहिती मिळाल्याने या दोन्ही ठिकाणी जाऊन नाग व्यवस्थित ताब्यात घेतल्याची माहिती सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने दिली.
दरम्यान हंगेवाडी येथिल सुदर्शन युवराज सांगळे हा तरुण इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असून उपचारामुळे त्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली असून याआधी आश्वी परिसरातील आश्वी खुर्द, दाढ खुर्द, दाढ बुद्रुक, दुर्गापूर व कांगणवाडी याठिकाणी मागील पाच दिवसात तब्बल ८ ते १० विषारी नाग सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने ताब्यात घेऊन निसर्गात मुक्त केले होते.
तर पुन्हा एकाचं रात्री तीन ठिकाणी नाग आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून नागरीकानी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.