‘चार दिवस पैसे उशीरा भेटतील पण, हा बिरोले शेतकऱ्याचे पैसे बुडवणार नाही - रविंद्र बिरोले

संगमनेर Live
0
◻️ श्री. गजानन महाराज कारखाण्याचा ६ व्या गंळीत हंगामाचा बॉयलर पेटला

◻️ ‘मी व्यापारी माणूस मला राजकारण करायचं नाही’

संगमनेर Live | मागील वर्षी अनेक कारखाण्यानी मार्च - एप्रिल पर्यत ही ऊस नेला नाही. त्यामुळे साकूर परिसरातील शेतकरी माझ्याकडे आले होते. आपण शेतकरी अडचणीत असताना खोडक्या झालेला ऊस आणून शेतकरी जगवण्याचे काम केले. या गळीत हंगामात ‘गरज सरो अनं वैद्य मरो’ ही भुमिका ऊस उत्पादक शेतकऱ्यानी न घेता नियमित पणे कारखाण्याला ऊस गाळपासाठी पाठवणे गरजे आहे. ‘चार दिवस पैसे उशीरा भेटतील पण, हा बिरोले शेतकऱ्याचे पैसे बुडवणार नाही ’ असे आश्वासन रविंद्र बिरोले यानी शेतकऱ्याना दिले.

संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथे श्री. गजानन महाराज साखर कारखाना भक्तनगर या कारखाण्याचा ६ वा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ऊस उत्पादक व सभासदाना मार्गदर्शन करताना कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविद्रं बिरोले हे बोलत होते. संचालिका अश्विनीताई बिरोले, शंतनु बिरोले, ईशाताई शंतनु बिरोले, नंदन बिरोले, अँड. रामदास शेजुळ, हरिभाऊ गिते, सुभाष कोळसे, केरुबापू मगर, बी. एन. पवार यांच्यासह संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, नेवासा, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातुन आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविद्रं बिरोले पुढे म्हणाले की, मी व्यापार करायलो असून मला राजकारण करायचं नाही. त्यामुळे आम्ही कारखाना परिसर असा ३० कि. मी. चा विभाग बनवला आहे. या परिसरातील शेतकऱ्याचा १४ ते १५ महिन्याचा ऊस तोडणीला आम्ही प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे या शेतकऱ्याना २० ते ३० टक्के वजणात फायदा होणार असल्याने शेतकऱ्यानी क्षणिक अमिषाला बळी न पडता, १०० ते १५० रुपयाचा जास्त विचार करत बसू नये व कारखान्याला ऊस घालण्यास प्राधान्य द्यावे. 

राज्यस्तरावर आपल्या कारखाण्याचे कौतुक झाले असून फेब्रुवारी महिन्यात कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने शेतकऱ्याना यांचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगताना निळवंडे कालव्याचे ३ वर्षाचे काम ८ वर्ष होऊनही पूर्णत्वास जात नसल्याने त्यानी नाराजी व्यक्त करत यासाठी शेतकऱ्यानी पाठपुरावा करण्याचे मत व्यक्त केले. तसेच मागील वर्षी एका दिवसात ५ हजार ४०० मेट्रीक टनाचे आपण गाळप केले असल्याने यावर्षी प्रतिदिन ५ हजार मेट्रीक टन गाळपाचे कारखाण्याचे उद्दिष्ट असल्याने खंबिरपणे ऊस उत्पादक शेतकरी व सभासदानी कारखाण्याच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.

यावेळी कारखाण्याचे संचालक शंतनु बिरोले यानी मनोगत व्यक्त करताना ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस वेळेवर तुटला पाहिजे. यासाठी कारखाण्याने नियोजन केल्याची माहिती देऊन कारखाना परिसरातील ऊस गांळपापासून शिल्लक राहु नये यासाठी शेतकऱ्यानी सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले.

याआधी प्रास्ताविक करताना कारखाण्याचे जनरल मँनेजर बी. एन. पवार यानी कारखाण्याकडून ४२५ वाहणाच्या माध्यमातून ऊस पुरवठा व ऊस तोडणीसाठीची सर्व व्यवस्था केल्याची माहिती देऊन या वर्षी कारखान्याकडे १० हजार हेक्टर ऊसाची नोदंणी झाल्याचे सांगितले. तर सुरु होणाऱ्या गंळीत हंगामात ७ ते ८ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्याचे कारखान्याने नियोजन केल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान यावेळी बाबासाहेब कुटे, वर्क्स मँनेजर अनिल वाकचौरे, अजित गुळवे, गोरक्षनाथ डहाळे, खरात, देशमाने, रणावरे, फारुकी, वर्पे, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, अण्णा नाना खेमनर, गुलाब भोसले, बाबाजी सागर, योगेश खेमनर, कैलास डोगंरे, लक्ष्मण गिते, सरपंच राहुल गंभिरे, लालु शेख, संदीप पंचपिड, सुभाष खेमनर, अशोक खेमनर, शिवाजी भोसले, विलास गागरे, योगेश सानप, अशोक पारखे, जबाजी ठाकरे, शेषराव वणे, दत्तात्रय आंधळे, सतिष गायकवाड, राजेद्रं कोळसे, इंद्रभान ठोकळे, श्रीरंग गागरे, विनायक जाधव, केशव शिदें, दत्तात्रय कुसाळ याच्यांसह नेवासा, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातुन आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !