◻️आश्वी बुद्रुक येथे वयोश्री योजनेतील लाभार्थ्याना विविध साधन साहित्याचे वाटप
◻️गोर-गरीबाच्या अशिर्वादामुळेचं साहेब मंत्री व पालकमंत्री झाले
संगमनेर Live | केद्रं सरकारने वयोश्री योजनेसाठी ७६ कोटी रुपयाचा निधी दिला होता. त्यातून आपण एकट्या अहमदनगर जिल्ह्यासाठी ४२ कोटीचा निधी मिळवत ४० हजार गोर-गरीब जनतेला साधन साहित्याचे वाटप केले आहे. त्याचं गोर-गरीब जनतेच्या प्रबळ आशिर्वादामुळे राज्यात संत्तात्तर झाले व ३५ वर्षाच्या संघर्षानतंर ना. विखे पाटील हे राज्यात दुसऱ्या क्रंमाकाचे असलेल्या महसूल मंत्रीपदी विराजमान झाले. असे प्रतिपादन खा. सुजय विखे पाटील यानी केले आहे. तसेच सर्वसाधारण जनतेचा विश्वास संपादन करुन गोरगरीब जनतेला व वयोवृद्ध नागरीकाना प्रत्येक संकटात आधार देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान असल्याचे यावेळी म्हटले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि आधिकरीता मंत्रालयाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्याना खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्तें विविध साधन साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना खा. विखे पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, एकनाथ नागरे, मच्छिद्रं पावडे, विनायकराव बालोटे, भाऊ गायकवाड, भाऊसाहेब जऱ्हाड, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, अँड. रोहिनीताई निघुते, डॉ. दिनकर गायकवाड, संजय गांधी, भाऊसाहेब शेजुळ, मच्छिद्रं थेटे, निवृत्ती सांगळे, प्रकाश उंबरकर, प्रभाकर निघुते, रंभाजी इलग, विजय डेगंळे, अँड. अनिल भोसले, मकरंद गुणे, अशोक जऱ्हाड, आण्णासाहेब जऱ्हाड आदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले की, कोण आरोप करतो.?, कोण निवडूण आलं.?, कोण पडल.? यापेक्षा काम करण्यात विखे पाटील परिवार विश्वास ठेवतो. दोन महिन्यापूर्वी सरकार बदलेल अस कोणालाही वाटले नव्हते. सत्ता नसल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे व केसेस दाखल केल्या जात होत्या. त्यामुळे कार्यकर्ते हवालदिल झाले होते. पण, गोर-गरीब जनतेच्या आशिर्वादामुळे राज्यात संत्तात्तर झाले. ३५ वर्षाच्या संघर्षानतंर ना. राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री व २२ वर्षानतंर पालकमंत्री झाल्याची भावना त्यानी व्यक्त केली.
आ. बाळासाहेब थोरात व आ. प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता खा. सुजय विखे पाटील म्हणाले की, शेजारी अनेकजन मंत्री झाले. पण, त्यानी लोकानबरोबर कधी आनंद साजरा केला नाही. परंतु साहेब, मंत्री झाल्यानतंर मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला मिठाई व आभार पत्राचे वाटप करुन आमच्या आनंदात सहभागी करुन घेतल्याचे सांगताना ते म्हणाले की, जे कलाकार तुम्हाला सांगत होते की, काही मिळणार नाही. त्याना हे वयोश्री योजनेत मिळालेले साधन साहित्य दाखवा असा टोला याप्रसंगी लगावला. तर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी मतदार संघात विकासाचे राजकारण सुरु असल्याचे ते म्हणाले.
विखे पाटील कुटुंब हे नेहमी केद्रं व राज्य शासनाच्या योजना गोर-गरीब जनतेपर्यत पोहचवण्याचे काम करत आले आहे. देशात सर्वसमावेशक काम होत असताना कोव्हीड लसीकरण, मोफत धान्य याबरोबर अनेक जनकल्याणकारी योजना केद्रं सरकारने सुरु केल्या आहेत. त्यामुळे जेव्हा कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली केंद्र सरकारची योजना येईल, त्या योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन खा. सुजय विखे पाटील यानी उपस्थिताना केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अँड. शाळीग्राम होडगर यानी शिर्डी मतदार संघ हा विकास कामाबरोबरचं वैयक्तिक योजनेतही आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान यावेळी खा. सुजय विखे पाटील, अँड. शाळीग्राम होडगर व उपस्थित मान्यवराच्या हस्तें आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, ओझर बुद्रुक व ओझर खुर्द येथील लाभार्थ्याना केद्रं सरकाच्या वयोश्री योजनेतील साहित्याचे वाटप करण्यात आल्यामुळे जेष्ठ नागरीकाच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाची भावमुद्रा उमटल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते.