◻️तज्ञं डॉक्टराचे पथक राहणार उपस्थित
◻️‘दिव्य कोजागिरी अमृतयोग’ दमा रुग्णासाठी मोफत दिला जाणार
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय येथे कोजागिरी पोर्णिमेनिमित्त मोफत भव्य दमा (अस्थमा) शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कोजागिरी व शरद पोर्णिमा हा एक उत्सव म्हणून मांचीहिल शैक्षणिक संकुलात साजरा केला जातो. यावर्षी रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमा असून भारतीय संस्कृतीत या पोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. दमा किवा अस्थमा यासारख्या आजारावरील औषधे खीरीमध्ये मिसळून कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री चंद्र प्रकाशात ठेवली जातात. चंद्राची शितल चंद्र किरणे त्या खीरीवर पडल्यानतंर त्याचा गुणधर्म बदलतो.
अशी खीर आजारी व्यक्तीस खाण्यास दिल्यास त्या व्यक्तीला त्याचा लाभ होत असल्याचे औयुर्वेद शास्रात सिध्द केल्याची मान्यता आहे. या शिबिर काळात ‘दिव्य कोजागिरी अमृतयोग’ दमा रुग्णासाठी मोफत दिला जाणार असून ज्या नागरीकाना दमा (अस्थमा), वारवार सर्दी, अँलजिक सर्दी, बालदमा असलेल्यानी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी डॉ. रविद्रं आन्नाम, डॉ. स्मिता कोलते, डॉ. अविनाश जाधव, डॉ. निशांत इंगळे, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. संजीव लोखंडे या तज्ञं डॉक्टराचे पथक उपस्थित राहणार असून या शिबिराचा संगमनेर तालुक्यासह आश्वी पंचक्रोशीतील नागरीकानी लाभ घ्यावा असे आवाहन रुपेश अनर्थे, डॉ. शुक्राचार्य वाघमोडे, बाळाराम सांगळे, प्रा. दत्ता शिंदे यानी केले आहे.
दरम्यान ज्या नागरीकाना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे, त्यानी विजय सांगळे व प्रशांत वाकचौरे यांच्याशी नाव नोदंणीसाठी संपर्क साधावा असे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे.