◻️ मोहित गायकवाड यांच्या कृष्ण भूषण दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना दिवाळीची भेट
◻️ पंचक्रोशीचं नव्हे तर तालुक्यात उच्चाकी परतावा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द सह पंचक्रोशीत दूध संकलनात आग्रेसर असलेल्या कृष्ण भूषण दूध संकलन केंद्राकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकाना दिवाळी भेट म्हणून संस्थेचे संस्थापक मोहित गंगाधर गायकवाड यांनी दुधाला प्रतिलिटर साडेपाच रुपयानी अनामत व रिबेटचे वाटप केले आहे. पंचक्रोशीचं नव्हे तर तालुक्यात उच्चाकी परतावा दिल्यामुळे सर्वत्र या संस्थेचे कौतुक होत असून नुकताचं मोहित गायकवाड यांचा यामुळे संत्कार करण्यात आला आहे.
आश्वी खुर्द येथिल कृष्ण भूषण दूध संकलन केद्रं हे आश्वी सह पंचक्रोशीत उच्चांकी दरासाठी प्रसिद्ध असून यावर्षी संसस्थेने सर्व विक्रम मोडत दूध उत्पादकाना प्रतिलिटर अनामत ३ रुपये व रिबीट २ रुपये ५० पैसे असे एकूण ५.५० (पाच रुपये पन्नास पैसे) रोख स्वरूपात वाटप केले आहे.
रिबेट व अनामत उच्चांकी भावाने वाटप केल्यामुळे संस्थेचे संस्थापक मोहित गायकवाड यांचा नुकताच माजी पंचायत समिती सदंस्य सरुनाथ उंबरकर, दत्तात्रय मांढरे, पत्रकार संजय गायकवाड, कुलदीप भवर, दत्तात्रय बापूसाहेब गायकवाड, यशवंत वाल्हेकर, बाळासाहेब गोपीनाथ शिंदे, डॉ. वीरेश भोसले, डॉ. श्याम नागरे, राजेंद्र यादव, मनोज भंडारी, मनोज मेहेरे, नामदेव दातीर, शंकर भोसले, बाबासाहेब भोसले, विशाल शिरतार, रवीद्रं बर्डे, राजेद्रं भडकवाड, सचिन बोरुडे, मधूकर मुन्तोडे, बाळासाहेब बिडवे, नारायण शिदें यांच्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यानी संत्कार करुन कौतुक केले आहे.
यावेळी मान्यवर व दुध उत्पादकानी केलेल्या संत्कारामुळे मोहित गायकवाड भारावून गेले होते. याप्रसंगी त्यानी भविष्यकाळात या संस्थेला बल्क कुलर आणून संस्थेची दूध खरेदी वाढवण्याबरोबरचं शेतकऱ्यांना उच्चांकी भाव मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
मोहित गायकवाड या तरुण उद्योजकाने खऱ्या अर्थाने दूध उत्पादक शेतकऱ्याना न्याय देण्याचे काम केले असून दूधाला उच्चांकी रिबेट व अनामत देणारे हे तालुक्यातील एकमेव संकलन केद्रं असण्याची शक्यता आहे. पंचक्रोशीतील इतर दूध संकलन केद्रं वा संस्थानी मोहित गायकवाड याच्यां संस्थेचा आदर्श घेऊन योग्य भाव, रिबीट, अनामत रक्कम देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासावे असे आवाहन सरुनाथ उंबरकर यानी करताना मोहित गायकवाड यांचे कौतुक केले आहे.