आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेचे सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते उध्दघाटन
संगमनेर Live (लोणी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडीया धोरणामुळे देशातील खेळाडूना प्रोत्साहन मिळाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेचा उदघाटन समारंभ सौ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे अधिष्ठाता (कृषी) व संचालक शिक्षण डॉ. प्रमोद रसाळ, कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहाण, क्रिडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, संस्थेचे संचालक कैलास पाटील तांबे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे, कृषि संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, प्राचार्य विशाल केदारी, प्राचार्य डॉ. रोहीत उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेतून विद्यार्थांना प्रोत्साहन मिळते परंतू आशा स्पर्धेत यश अपयशापेक्षा सुध्दा मिळणारा आत्मविश्वास मोठा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध योजना तयार करण्यासाठी दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळेच देशातील सर्व सामान्य खेळाडू आज चांगले यश संपादन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे सौ. विखे यांनी स्पष्ट केले.
योगा सारख्या क्रीडा प्रकाराचे महत्व मोदीनी जगात अधोरेखीत केले आंतराष्ट्रीय योगा दिन जाहीर करून आपल्या संस्कृती परंपरेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले यामुळेच क्रीडा क्षेत्रात सुध्दा आता करीअर घडवता येवू शकते हा विश्वास मिळाला. शरीर स्वास्थ्य आणि मनाची एकाग्रता ही खेळातूनच निर्माण होवू शकते असा संदेशही स्पर्धकांना त्यांनी आपल्या शुभेच्छांमधून दिला.
कृषि संचालक डॉ. प्रमोद रसाळ यांनी प्रवरेतील आपल्या शैक्षणिक वाटचालीच्या आठवणींना उजाळा देतांनाच जिंकण्यासाठी खेळा पण त्यातून आपले रेकॉर्ड बनवा. खेळातून शाररीक क्षमता, टिमवर्क सांघिक भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कृषि कृषि संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहीती देत दिली. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत दहा जिल्हातील ३८ संघातून ३६४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुचिका चौधरी आणि अमोल माने यांनी तर आभार क्रिडा संचालक शिक्षक प्रा. सिताराम वरखड यांनी मानले.