◻️ आश्वी खुर्द येथिल ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु होते उपोषण
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल सामाजिक कार्यकर्ते युन्नुस सय्यद यानी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी सकाळी उपोषण सुरु केले होते.
दुपारच्या सुमारास ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यानी युन्नुस सय्यद याना लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे सय्यद यानी सुरु केलेले उपोषण मागे घेतले आहे.
दरम्यान यावेळी ग्रामसेवक प्रवीण इल्हे, उपसपंच सुनील मांढरे, मकरंद गुणे, कैलास गायकवाड, विजय गायकवाड, मोहित गायकवाड, माणिक भवर, लक्ष्मण सातपुते, संतोष भडकवाड, विकास गायकवाड, कादर सय्यद, बालम सय्यद, नानासाहेब गायकवाड, बाबासाहेब भोसले, बंटी मांढरे, व्ही. टी. गायकवाड, ऐजाज तांबोळी, जमाल सय्यद, सुरेश मांढरे, हवालदार विनोद गंभिरे आदिसह गावातील जेष्ठ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.