अश्विनी पतसंस्थेच्या स्थापनेसाठी तुमचे योगदान काय.? - रंभाजी पाटील इलग

संगमनेर Live
0
◻️ जनसेवा मंडळाची पिप्री - लौकी अजमपूर येथे झंझावाती प्रचार सभा

◻️ उमेदवाराकडून सभासदाच्या ‘डोर टू डोर’ भेटीगाठीने प्रचारातील चुरस वाढली

संगमनेर Live (रविद्रं बालोटे) | पद्मभुषण दिवगंत मा. खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १९८५ साली अश्विनी ग्रामीण पतसंस्थेची स्थापना करुन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेची यशंस्वी वाटचाल सुर आहे. या संस्थेच्या स्थापनेवेळी आम्ही घरोघरी जाऊन १ रुपया प्रवेश फी व ५० रुपये शेअर गोळा केला. 

यासाठी गंगाधर पाटील आंधळे, बाळासाहेब मांढरे, सुर्यकांत भंडारी, अशोक गांधी, रमेश चोपडा, काशिनाथ उंबरकर व विजयराव चतुरे यांच्या तत्कालीन संचालक मंडळाने कष्ट घेऊन ही संस्था उभी केली. आता आम्हीचं सर्व काही केले असा ढोल बडवणारे त्यावेळी कोठे होते.? याचे आत्मपरिक्षण करणे गरजे असून अश्विनी पतसंस्था स्थापनेमध्ये जनसेवा विकास मंडळाचे योगदान काय.? असा घणाघाती सवाल संस्थेचे संस्थापक संचालक रंभाजी पाटील इलग यानी विचारला आहे.

जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीनिमित्त पिप्रीं - लौकी अजमपूर येथे आयोजित प्रचार सभेत सभासदाना मार्गदर्शन करताना रंभाजी पाटील इलग बोलत होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक गंगाधर पाटील आंधळे, मुरलीधर पाटील आधळे, रंगनाथ पाटील आंधळे, प्रा. दातीर, बादशाह लावरे, अशोक गिते, प्रा. बाळासाहेब आंधळे, भाऊसाहेब दराडी, गंगाधर गिते, विलास पाटील आंधळे आदिसह उमेदवार, सभासद व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उमेदवारानी सभासदाच्या ‘डोर टू डोर’ भेटीगाठी घेऊन प्रचारातील चुरस आणखी वाढली आहे.

याप्रसंगी रंभाजी पाटील इलग मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, संस्थेची आश्वी बाजारपेठत दिमाखदार व भव्य अशी इमारत असून लोकानमध्ये विश्वास निर्माण झाल्यामुळे संस्थेचा लौकीक जिल्हाभरात वाढला आहे. त्यामुळे हा विश्वास जपण्यासाठी व संस्था नव्या जोमाने आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवाराना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. असे आवाहन उपस्थित सभासदाना शेवटी केले आहे.

गंगाधर आंधळे, प्रा दातीर, बादशाह लावरे व अशोक गिते यांची ही यावेळी भाषणे झाली आहेत. दरम्यान याप्रसंगी जनसेवा मंडळाचे उमेदवार असलेले विलास मुरलीधर आंधळे, भिका पंढरीनाथ गिते, रघुनाथ गजाबा  जाधव, कैलास किसन नागरे, हौशिराम बाबुराव फड, राजेद्रं बबन बोद्रें, रामदास पांडुरंग ताजणे, संपत देवजी कदम, लिला कैलास नागरे, वैशाली बबन शिदें व डॉ. भानुदास सखाराम आंधळे याना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन वक्त्यानी केले आहे.
advertisement

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !