◻️ दोन परप्रांतीय पीडित मुलींची सुटका व एक महिला आरोपी ताब्यात
◻️ पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
संगमनेर Live | पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याबाबत गुप्त बातमी मिळाली होती.
त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे महामार्ग परिसरातील घाटात पोखरी शिवारात पोलीसानी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एका महिला आरोपी विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. ४०६/२०२२ नुसार महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे चागलेच दणाणले आहेत.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला व स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, चापोना. मनोज पाटील, पोकॉ नितीन शिरसाठ, मपोकॉ. मंगल जाधव यांनी केली आहे.