आश्वी खुर्द येथे खाजगी जागेवर ग्रामपंचायतीने बांधले व्यापारी गाळे.?

संगमनेर Live
0
◻️ सुरेश मांढरे यानी गंभिर आरोप करत सुरु केले ग्रामपंचायत विरोधात उपोषण

◻️ उपोषणाचा आजचा दुसरा दिवस

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेले व्यापारी गाळे हे सुरेश मांढरे यानी आपल्या हद्दीत बांधल्याचा खळबळजनक आरोप करत हे गाळे काढून घेण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणाचा आज गुरुवार हा दुसरा दिवस असून प्रशासनाकडून या उपोषणाची आद्याप कोणतीही दखल घेण्यात न आल्याचा दावा मांढरे यानी केला आहे.

याबाबत सुरेश मांढरे यानी उपोषणा दरम्यान दिलेली माहिती अशी की, सीटी सर्व्हे नंबर १८६ त्यामध्ये ग्रामपंचायत नंबर ३५९ व ३६० मध्ये ग्रामपंचायत आश्वी खुर्द यानी बेकायदेशीरपणे व्यापारी गाळे बांधले आहे. याबाबत मी ग्रामपंचायतीला वारंवार कल्पना दिली व त्या जागेची मोजणी केली. 

परंतू माझ्या जागेतील बेकायदेशीर बांधकाम ग्रामपंचायतीने काढले नाही किंवा त्याचा मोबदलाही मला दिलेला नाही. त्यामुळे बुधवार दि. २१ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपोषणकर्ते सुरेश मांढरे यानी दिली आहे.

या उपोषणस्थळी गावातील अनेक ग्रामस्थानी भेट देऊन सुरेश मांढरे याच्यांशी चर्चा करुन या उपोषणाला आपला पाठींबा दिला असला तरी या उपोषणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल आद्यप घेण्यात न आल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला उपोषणाचा विसर पडला की काय.? याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

दरम्यान सदर उपोषण कर्त्याचा सीटी सर्वे उतारा व मुळ खरेदी खत नोदंणीत तफावत आढळून येत असल्याने वरिष्ठाना याबाबत सविस्तर माहिती कळवण्यात आली आहे. भूमि अभिलेख अहमदनगर यांच्याकडून याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानतंर वरिष्ठाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी माहिती ग्रामसेवक प्रवीण इल्हे यानी दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !