उप सरपंच निवडीसाठी २९, ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारीचा मुहूर्त ठरला.!

संगमनेर Live
0
◻️ जिल्हाधिकारी राजेद्रं भोसले यांचे प्रशासनाला आदेश

◻️ नुतन सरपंचाच्यां अध्यक्षतेखाली ३७ ग्रामपंचायतीची होणार पहिली सभा

संगमनेर Live | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नुकत्याचं संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपन्न झाल्या आहेत. २० डिसेंबर रोजी लोकनियुक्त सरपंच व सदंस्य निवडीचे निकाल जाहीर करण्यात आले. 

आता नुतन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली या ग्रामपंचायतीची पहिली सभा उप सरपंच निवडीसाठी होणार असून त्यासाठी दि. २९, ३०, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२३ हे चार दिवस निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यानी जारी केल्याची माहिती मिळाली आहे.

पंचवार्षिक मुदतीचा कार्यकाळ सपलेल्या राज्यसह संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीचा समावेश होता. सरपंच व सदंस्य पदासाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. दि. २० डिसेंबर रोजी तहसिलदाराच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीची मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात आले होते. 

सरपंच आणि सदंस्य निवडीनतंर या गावाना उप सरपंच निवडीचे वेध लागले होते. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम २८ मधील पोट कलम एक नुसार सरपंच व सदंस्याची निवड झाल्यानतंर उप सरपंच निवडीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेशानुसार करण्यात आले आहे. 

ही सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून उप सरपंच निवडणूकीची प्रक्रिया प्रशासकीय द्रृष्ट्या पार पडण्यासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून वर्ग २ च्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २९, ३०, ३१ डिसेंबर २०२२ आणि १ जानेवारी २०२३ या चार दिवसाचा मुहूर्थ उप सरपंच निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने जारी करण्यात आला आहे.

तारीख निहाय उप सरपंच निवडीच्या तालुक्यातील ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे..

गुरुवार दि. २९ डिसेंबर २०२२ :- 

निबांळे, धांदरफळ खुर्द, जांबुत बुद्रुक, चिकणी, कोळवाडे, निमगाव भोजापूर, कर्जुले पठार, मालुंजे, निमगावजाळी, हंगेवाडी, रणखांब, निळवंडे, सादतपूर, दरेवाडी, घुलेवाडी, करुले, रहिमपूर, धांदरफळ बुद्रुक

शुक्रवार ३० डिसेंबर २०२२ :- 

कनकापूर, वडझरी खुर्द, ओझर खुर्द, डोळासणे, पोखरी हवेली, सांयखिडी, चिंचोली गुरव, पिपंरणे, वडझरी बुद्रुक, जोर्वे, कोल्हेवाडी, उंबरी बाळापूर, तळेगाव दिघे, निमोण अंभोरे

रविवार १ जानेवारी २०२३ :- 

वाघापूर, खराडी, साकुर व जाभुंळवाडी

***महिती स्रोत :- दैनिक पुण्यनगरी

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !