इहलोकीचा प्रवास देवलोकापर्यत करणाऱ्या स्मशानभूमीचे रुपडे पालटले

संगमनेर Live
0
◻️ आश्वी बुद्रुक येथे ४५ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आली निसर्गरम्य स्मशानभूमी

◻️ आम्रेश्वर महादेव मंदिरालगत स्मशानभूमी असल्याने परिसराला ज्योतिर्लिंगापेक्षा कमी महत्त्व नाही

संगमनेर Live (संजय गायकवाड) | स्मशानभूमी म्हटल की, उजाड व भयान वाटणारी जागा, काट्या - कुट्याचा रस्ता, सर्वदूर दुर्गधी, गुडघ्यापर्यत वाढलेले गवत, शोकाकूल कुटुंबिय, नात्या - गोत्यातील माणसे, मित्रपरिवार व ग्रामस्थाना बसण्यासाठी ही जागा नसणे, मोडके - तोडके शेड व त्यातून आटोपले जाणारे अत्यंविधी, असेचं चित्र बहुदा स्मशानभूमीबाबत प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे दुखित अंतकरणाने आलेला व्यक्ती स्मशानभुमीत आल्यानंतर त्याला प्रसन्न वाटावे यासाठी युवा नेते विजयराव हिगें याच्यां संकल्पना व प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वच्छ, सुदंर, हिरवाईने नटलेली व अंत्यविधीसाठीच्या सोयी - सुविधा युक्त नव्याने उभी राहिलेली स्मशानभूमी पाहून आपल्या गावात ही अशीचं स्मशानभूमी असावी असे वाटल्याशिवाय राहत नाही.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीने विविध विकासकामे करत असताना युवा नेते विजयराव हिगें यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच, उपसरपंच, सदंस्य व ग्रामसेवक याच्यां नेतृत्वाखाली प्रामुख्याने प्रवरानदी तिरावर असलेल्या हिदूं स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोडकळीस आलेली पत्र्याच्या स्मशानभूमीच्या जागी कॉक्रीटची स्मशानभूमी उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. एक एकर विस्तीर्ण अशा परिसराला सरक्षंण भित व बंदिस्त जाळी बांधण्याचे काम करण्यात आले. एकाचं वेळी दोन जणांवर अंत्यसंस्कार करता येतील अशा दोन भव्य कॉक्रीट स्मशानभूमीचे साचे उभे करण्यात आले असून त्यामध्ये दोन नवीन जळक्या बसवण्यात आल्या आहेत.

स्मशानभूमी परिसरात रंगरंगोटी, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरीकाना बसण्यासाठी मोठे शेड बांधण्यात आले आहे. जागोजागी विविध वृक्ष तसेच फुलाची रोपे लावण्यात आली आहे. जुन्या आडाला रंगरंगोटी करुन त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या परिसरात सर्वत्र ब्लॉक बसवण्यात आल्यामुळे चिखल अथवा पाणी साचल्याणे डबके होणार नाही. 

रात्रीच्या वेळी अंधार राहू नये यासाठी ठिकठिकाणी रोषणाईची सोय करण्यात आली आहे. ही स्मशानभूमी सुदंर हिरवळीमुळे एक हिरवागार बगीचाच दिसत असून सुबक व सुदंर पध्दतीने बांधण्यात आलेली कमान तसेच दोन्ही बाजूने केलेली फुलाची सजावट येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. धर्मशास्त्रानुसार सर्व सेवा सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्यामुळे परिसरातील गावातील नागरीक जाणीवपूर्वक येथील काम बघण्यासाठी येताना दिसत आहेत.

या स्मशानभूमीत किर्तण व प्रवचणासाठी सुदंर असा कॉक्रीटचा छोटासा गोल मंडप उभारण्यात आला आहे. तसेचं दशक्रिया विधी, आघोळ, हातपाय धुणे, स्वच्छता गृह यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अंत्यविधी तथा दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरीकाच्या बसण्यासाठी स्टेडियम प्रमाणे रचना करण्यात आली आहे. 

त्यामुळे स्मशानभूमीत आपल्या माणसाचा इहलोकातून देवलोकात प्रवासाच्या थांब्यावर आल्यानतंर नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, ग्रामस्थं याना प्रसन्न वाटेल यांची पुर्ण काळजी सुशोभिकरणादरम्यान घेण्यात आली आहे. त्यामुळे असा प्रकल्प साकारण्यासाठी केवळ संवेदनशील व मातृह्रदयी व्यक्तीमत्व विजयराव हिगें याचे असल्यामुळेचं हा प्रकल्प पुर्ण झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थानी व्यक्तं केली आहे. तसेच आम्रेश्वर महादेव मंदिरालगत स्मशानभूमी असल्याने परिसराला ज्योतिर्लिंगापेक्षा कमी महत्त्व नसल्याचे जुन्या जानत्या लोकाचे म्हणणे आहे.

दरम्यान या स्मशानभूमीच्या कामासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यानी २५१५ अंतर्गत घाट बांधण्यासाठी १० लाख रुपये तसेच सुशोभिकरणासाठी ७ लाख रुपये असा एकून १७ लाख रुपये निधी दिला. केद्रिंय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यानी सुशोभिकरण, बंदिस्त जाळी व इतर कामासाठी १० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता गृह व इतर सुविधा उभारणीसाठी ३ लाख रुपये निधी देण्यात आला असून १५ व्या वित्त आयोगातून दोन नवीन जळक्यासाठी १२ लाख रुपये तसेच नवीन शेड बांधकामासाठी ३ लाख ७९ हजार रुपये निधी उपलब्ध झाला होता. असा एकून ४५ लाख रुपये निधी या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी खर्च करण्यात आल्यामुळे ही स्मशानभूमी एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे भासत असून सर्वत्र या कामाचे कौतुक होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !