‘आई, हा केवळ एक शब्द नाही. तर जीवनातील ही अशी एक भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास अशा कित्येक गोष्टी समाविष्ट असतात. जगातील कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही देशात, प्रत्येक मुलाला सर्वात प्रिय व्यक्ती आपली आईच असते.
आई केवळ आपल्या शरीराच्या वाढीकडे नाही, तर आपलं मन, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास या गोष्टींच्या विकासाकडेही लक्ष देते. आपल्या मुलांकडे लक्ष देताना आई स्वतःलाही विसरून जाते.’ अशी प्रेमळ आई आम्हाला लाभली. त्यामुळे आम्ही भाग्यवंत ठरलो असल्याची भावना आदर्श माता श्रीमती सरुबाई रामभाऊ सांगळे याच्यां अभिष्टचितंन सोहळ्याच्या पुर्वसंध्येला त्याचे सुपुत्र बापूसाहेब सांगळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीमती सरुबाई सांगळे यांचा ७५ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्याचा निर्णय त्याचे सुपुत्र तथा मुंबई येथे व्यावसायानिमित्त राहत असलेले उद्योजक बापूसाहेब सांगळे यानी घेतला आहे. त्यानिमित्त आपल्या आई विषयी बापूसाहेब सांगळे भरभरुन बोलत होते.
श्रीमती सरुबाई सांगळे यांचा जन्म १९४७ साली शेडगाव (ता. संगमनेर) येथिल दिवगंत भागा विठोबा आमले यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. दिवगंत भाऊ हौशीराम आमले यांच्यासह कुटुंबाच्या सानिध्यात त्याचे बालपण गेले. पुढे शेडगाव येथेचं रामभाऊ सोनाजी सांगळे याच्यांशी त्याचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.
त्याना दत्तू सांगळे, बापूसाहेब सांगळे ही दोन मुले व सौ. अलका रंभाजी सानप ही मुलगी अशी तीन अपत्य आहेत. परंतू काळाने घाला घालतल्यामुळे २००० साली पती रामभाऊ सांगळे याचा मृत्य झाला होता. तर २०२१ साली झालेल्या अपघातात मुलगा दत्तू सांगळे यांचे दुर्दैवी निधन झाले. अशा दोन मोठ्या आघाताने त्या मनातून पुर्ण खचल्या खऱ्या परंतू, आपले कुटुंब सावरण्यासाठी पुन्हा जोमाने कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे आवढा गिळत सांगताना बापूसाहेब सांगळे यांचा कंठ दाटून आला होता.
आज माझ्या जीवनात जे काही चांगले आहे ; ती माझ्या आई व वडिलाची देणगी आहे. मी मुबंईसह महाराष्ट्रभर आज उद्योगाच्या निमित्ताने जात असल्याने मी पुर्णवेळ आईच्या सानिध्यात राहु शकत नाही अशी खंत ही यावेळी बापूसाहेब सांगळे यानी व्यक्त केली.
माझी आई जेवढी सामान्य आहे, तेवढीच ती असामान्यही आहे. अगदी प्रत्येक आई असते, तशीचं. आईची तपस्या, तिच्या मुलांना एक चांगली व्यक्ती बनवते. आईची ममता तिच्या मुलांमध्ये मानवी भावना निर्माण करते. आई एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व नाही, तर ती एक स्वरूप आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, जैसा भाव तैसा देव. त्याचप्रमाणे आपल्या मनातील भावानुसार, आपण आईचे स्वरूप अनुभवू शकतो.’
माझ्या आईच्या जीवन प्रवासात मला मातृशक्तीचे तप, त्याग आणि योगदानाचे दर्शन होते. आमच्या सांगळे कुटुंबासह, नातेवाईक व भावकीतील कुटुंबावर तिचं प्रचंड प्रेम आहे. माझ्या आईनं नेहमीच माणसं जोडली. तिनं एखाद्या व्यक्तीवर विश्वास टाकला, की तो विश्वास कधीच तिनं मोडू दिला नाही. आईने मलाही माणसं जोडायला शिकवलं.
आईचं एकच होतं, कितीही पैसा आपल्याकडं असला, तरी आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत. पैशानं माणूस कधीच मोठा होत नाही, हे तिचं वाक्य ठरलेलं. ती नेहमी म्हणते ‘‘आजवर मी पैसा कमावला नाही; पण माणसं इतकी कमावली, की मी एक फोन केला, तर शंभर माणसं माझ्यासाठी उभी राहतील.’’ गरजू लोकांसाठी आमच्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असायचे. कधी कोणाला पैशांची गरज लागली, तर आईनं त्यांना कधीच नकार दिला नाही. गरीब विद्यार्थ्याना शालेय मदत असो, आदिवासी व गरीब महिलाना मदत तसेच धार्मिक कार्यात ती नेहमी आग्रेसर असते.
तिची इतरांना मदत करायची पहिल्यापासूनची सवय हे सगळे बाबांचेच संस्कार. मला अभिमान आहे की, माझ्या आईवर प्रेम करणारी इतकी मंडळी आज तिच्या आजूबाजूला आहेत. हे माझ्या आईचं वैशिष्ट्य मी अभिमानानं मिरवत असतो. माझ्या आईने भारतीय संस्कृती केवळ जपली नसून ती जपण्याचे संस्कार ही आम्हाला दिल्यामुळे अशी प्रेमळ आई आम्हाला लाभली त्यामुळे आम्ही भाग्यवंत ठरलो असल्याच्या भावना उद्योजक बापूसाहेब सांगळे यानी अभिष्टचितंन सोहळ्याच्या पुर्वसंध्येला व्यक्त केल्या आहेत.
संकलन :- पत्रकार संजय गायकवाड
लेखन :- पत्रकार अनिल शेळके
*****
अभिष्टचितंन सोहळ्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा..
शनिवारी सकाळी ९ वा. आदर्श माता सरुबाई सांगळे यांची सवाद्य मिरवणूक काढली जाणार असून १० वा. गुरुदेव महंत आदिनाथ महाराज शास्री (तारकेश्वर गड, जि. बीड) यांचे जाहिर हरी किर्तण होणार आहे. यावेळी उंबरेश्वर मठाचे महंत दत्तगिरी महाराज या सोहळ्याला भेट देणार आहेत. आदर्श माता सरुबाई सांगळे यांचे पद्यपुजन, संत्कार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.
तसेच यानतंर गरीब, शेत मजूंर व ऊसतोड कामगाराना मातोश्रीच्या हस्तें उबदार कपड्याचे वाटप व त्यानतंर उपस्थिताना आग्रहपूर्वक गोड जेवनाचा आस्वाद घेता येणार आहे. या सोहळ्यासाठी शेडगाव ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन प्रथितयश उद्योजक व मातोश्रीचे सुपुत्र बापूसाहेब सांगळे यांनी केले आहे.