संगमनेर येथिल अनधिकृत व नियमबाह्य हॉस्पिटलवर कारवाई करा

संगमनेर Live
0
◻️ प्रवीण कानवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छावा संघटनेचे उपोषण सुरु

संगमनेर Live | संगमनेर शहरातील बहुतांश हॉस्पिटल नियमबाह्य व अनधिकृत असून यापूर्वी केलेल्या उपोषणा दरम्यान संगमनेर नगरपालिकेने तपासणी केलेल्या हॉस्पिटलवर अद्यापपर्यत कुठलीही कारवाई करत नसल्याने संगमनेर नगरपालिका प्रशासनाविरोधात राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले आहे.

संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पीटल असून परवानगी क्लिनिकसाठी जागेवर मात्र हॉस्पिटल असल्याचे दिसून येते. डी. सी. पी. आर. नियमानुसार मंजूर परवानगी पेक्षा जास्त बांधकाम असणारे हॉस्पिटल व क्लीनिक वर कारवाई करावी. हॉस्पिटल व क्लिनिक यांना संगमनेर नगरपालिकेचा ना हरकत दाखलाही नाही व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट प्रमाणपत्र देखील नाही, अशा हॉस्पिटलंवर त्वरित कारवाई करावी. 

संगमनेर शहरातील सर्व हॉस्पिटल यांना दरपत्रक प्रथमदर्शनी भागात लावायला लावावे व सर्व हॉस्पिटलमध्ये तपासणी फी चे नियम एकच करावा. शहरातील ज्या हॉस्पिटल व क्लिनिक अनधिकृत बांधकाम व नियमबाह्य आहेत अशा हॉस्पिटल यांना कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला देण्यात येऊ नये तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी यांनी देखील बॉम्बे नर्सिंग होम अँक्ट प्रमाणपत्र देऊ नये. 

तसेच संगमनेर शहरातील काही डॉक्टरांना त्यांच्या डिग्री प्रमाणे या ठिकाणी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देखील नाही तरी हॉस्पिटल चालू आहेत अशा डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून हॉस्पिटल त्वरित बंद करावे. अशा मागण्यांसाठी संगमनेर नगरपालिका प्रशासना विरोधात उपोषण सुरू करण्यात आले.

आम्ही संघटनेच्या वतीने नियमबाह्य, अनाधिकृत, बोगस हॉस्पिटल विषयी माहिती देऊनही नगरपालिका प्रशासन आरामात असल्याचे दिसून येते. मोठ्या इमारतीयुक्त हॉस्पीटल संगमनेर शहरात असून मंजूर बेड संख्या व प्रत्यक्षात असणारे बेड जास्त आहे. ना हरकत दाखला व हॉस्पिटल परवानगी देताना उपलब्ध असणारी साधनसामग्री तपासणी करणे ही जबाबदारी संगमनेर नगरपालिकेचे आहे तर हॉस्पिटलची सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे आहे. 

परंतु हे सर्व अधिकारी अशा हॉस्पिटल वर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या हॉस्पिटलंवर संगमनेर नगरपालिका प्रशासनाने कारवाईस टाळाटाळ केल्यास येथील जबाबदार अधिकाऱ्यांची देखील तक्रार नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणारा असल्याचे कानवडे यांनी सांगितले.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांची हॉस्पीटल मधून लुट झाल्याचे चित्र दिसले, ग्रामिण भागातील सर्व सामान्य माणुस आजारपणात शहराकडे धाव घेतो मात्र येथे येवून या ना त्या आजारातून त्यांचा भीती निर्माण करत त्यांची लुट करतात एक दोन वर्षातचं एखाद्या डॉक्टरचे भव्य इमारत उभी राहते त्यातून सर्व सुविधा नुसार हॉस्पीटल असल्याची प्रसिद्धी केली जाते मात्र तरी अव्वाच्या सव्वाने रुग्णांची लुटमार होताना दिसत आहे.

शहरामधील असणाऱ्या हॉस्पीटलांनी नकाशावर पार्किंग दाखवले मात्र प्रत्यक्षात पार्किंग नसल्याने शहरांमध्ये ट्राफिक ची समस्या रोजचे झाले आहे. नसल्याने यांची त्वरीत नगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा जोपर्यंत हॉस्पिटल वर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील असे उपोषणात सहभागी झालेले प्रविण कानवडे, तालुकाध्यक्ष जालिंदर राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख दिनकर घुले, तालुका संघटक सचिन भारुडे, किरण गुंजाळ, रूपेश राऊत, विकास खाणेकर, निलेश गुंजाळ यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !