आश्वी परिसराचे विकासदृष्टी असलेले चाणाक्ष नेतृत्व.. निवृत्ती उर्फ गुलाबराव सांगळे

संगमनेर Live
0
उत्तम राजकीय व्यवस्थापन कौशल्य, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राशी जोडलेली नाळ, सतत नाविन्याचा ध्यास, दूरदृष्टीचे वरदान, राजकारणातील जाणकार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा नेता ही निवृत्ती उर्फ गुलाबराव बाबुराव सांगळे यांच्या व्यक्तीमत्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. 

राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना कार्यकर्त्याला बळ देणे किती महत्वाचे असते यांचे अनुकरण त्याच्याकडून शिकण्यासारखे असले तरी प्रचंड ध्येयवादी, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसाविषयी वाटणारी कणव व पंचायत समिती सदंस्य झाल्यानतंर केलेली विकासकामे यामुळे या माणसाने जनमाणसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या ६१ व्या अभिष्टचितंन सोहळ्यानिमित्त केलेला लेख प्रपंच..

१९६१ साली शेडगाव (ता. संगमनेर) येथिल सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बाबुराव व ठकुबाई सांगळे यांच्या पोटी गुलाबराव सांगळे यांचा जन्म झाला. त्याना स्व. भिमाशंकर सांगळे, अश्विनी बँकेचे चेअरमन मेजर संपराव सांगळे, भाऊसाहेब सांगळे, शिवाजी सांगळे हे चार भाऊ तसेच दोन बहीनी अशी भावंडे आहेत. 

बालवयातचं गुलाबराव यांच्या मनावर मानवतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार दृढ होत गेले होते. स्वाभिमानी माता पित्याकडून मिळालेली संस्काराची शिदोंरी गुलाबराव यानी केवळ आपल्या कुटुंबापुर्ती मर्यादित ठेवली नाही. त्यामुळेचं बहुधा गावातील लहान-मोठी मंडळी त्याना आपुलकीने ‘पप्पा’ या टोपण नावाने हाक मारत असावी. आज सत्तेच मोठ गारुड त्यांच्या अवतीभवती असलं तरी गुलाबरावाची विनम्रंता वाखाणण्याजोगी असून सुसंस्कृत व मर्यादाशील या लाघवी नेतृत्वाचे पाय आजही जमिनीवर घट्ट असल्याची भावना त्याचे विरोधक त्यामुळेचं खाजगीत सागंत असावेत.

समाजकार्यासाठी सतत नाविन्याच्या शोधात दूरदृष्टीने आणि चाणाक्षपणे गुलाबराव विकासकामांची बांधणी करताहेत, सत्तेच्या राजकीय सारीपाटात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे लढत असल्यामुळे  नुकतीचं त्याच्या मार्गदर्शनाखाली झालेली अश्विनी पतसंस्थेची निवडणूक व एकहाती मारलेले मैदान ही त्याच्यांतील नेतृत्व गुणाची कमाई होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष सागांयचे झाल्यास गुलाबराव यांच्या मार्गदर्शनाचा अश्विनी पंतसस्थेच्या भरभराटीत सिहांचा वाटा असून मागील २५ वर्षापासून ते संस्थेचे संचालक म्हणून काम करत आहेत.

खरेतर कामाशी एकनिष्ठ असणाऱ्या गुलाबरावाना स्वतःची प्रसिद्धी फारशी आवडत नाही. वाढदिवसाचा बडेजाव तर त्यांनी कधीच मिरवला नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकामांची फारशी चर्चा समाज माध्यम आणि लोकमानसात झाली नसली तरी दस्तुरखुद्द ना. राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील कुटुंबाने त्यांच्या कामाचे नेहमी कौतुक केले आहे. 

गुलाबरावानी नेहमी नाविन्याचा ध्यास मनाशी बाळगल्यामुळे शेडगाव ग्रामपंचायतीची नुतन व प्रशस्त इमारात, तलाठी कार्यालय, पाणीपुरवठा योजना, सभामडंप, रस्ते, स्वस्त धान्य दुकान, जिल्हापरिषद शाळेला दोन वर्गखोल्या व डिजिटल करणे, मुक्ताई मंदिर, स्मशानभूमी ही दैदिप्यमान कामे उभे करून याचा मानदंड त्यांनी घालून दिला आहे. तर कोरोना सारख्या महासंकटात त्यानी जनतेच्या मदतीला धावून जाताना केलेली मदत, या कामाचा उल्लेख प्रामुख्याने याठिकाणी करावा लागेल.

“तुम्ही करा राजकारण मी सांभाळते घर.'' या वचनाप्रमाणे गुलाबरावाच्या पत्नी सखुबाई या मार्गक्रमन करत असल्यातरी एकदा पंचायत समिती सदंस्य पद भुषवून सामजसेवाही या माऊलीने केली आहे. त्यामुळे गुलाबरावाच्या पाठीशी सखुबाई या खंभीरपणे उभ्या असल्यामुळे गुलाबराव यानी प्रत्येक आघाडीवर यश मिळवले आहे. पचंरत्न म्हणून सांगळे कुटुंबातील पाच भाऊ पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यातील स्वं. भिमाशंकर सांगळे याचे निधन झाले असले तरी, पाचही भावाचे कुटुंब एकत्र ठेवण्याचे शिवधनुष्य गुलाबरावानी लिलया पेलल्यामुळेचं परिसरात आदराचे स्थान मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या पुनर्चनेत शेडगावचा शिर्डी मतदार संघात समावेश झाल्यानतंर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटातून गुलाबराव बाहेर पडले. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्व स्विकारणारे आश्वी परिसरातील पहिले कार्यकर्ते असल्याचा बहुमान त्याना मिळाल्यामुळे विखे पाटील कुटुंबाकडे त्याना विशेष मान दिला जातो. 

ग्रामपंचायत सदंस्य पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरवात करणारे गुलाबराव मागील पंधरा वर्षापासून गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. सरपंच, सेवा सोसायटीचे संचालक व चेअरमन, पंचायत समिती सदंस्य असा प्रवास करताना त्यानी गावात मागील वर्षी हभंप दत्तंगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकगिरी महाराज यांच्या फिरत्या अखंड सप्ताहाचे भव्य व यशस्वी आयोजन करत नियोजन कौशल्याची चुणुक दाखवली असली तरी, धार्मिक कार्यातही तितकेचं रममान होणारे गुलाबराव यानिमित्ताने सर्वसामान्यानी अनुभवले आहेत.

निवृत्ती पाटील उर्फ गुलाबराव सांगळे यांचा नुकताचं ६१ वा वाढदिवस त्याच्यां कुटुंबियानी साजरा केला असला तरी जनमाणसाशी नाळ जोडलेल्या या नेतृत्वाचा अभिष्टचितंन सोहळा राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुम-धडाक्यात साजरा करण्याचा निर्णय त्याच्यां निकटवर्तीयाच्यां सहकाऱ्याने कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरीकानी घेतला आहे. 

रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वा. लक्ष्मी माता मंदिर प्रागंणात या अभिष्टचितंन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवानेते खा. डॉ. सुजय विखे पाटील, मांचीहिल संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर तसेचं हभंप दत्तगिरी महाराज हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी हभप प्रकाश महाराज साठे (मुंडे), बीडकर यांचा अमृतूल्य किर्तणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याप्रसंगी गावातील दिव्यांग व्यक्तीना वस्रदान करण्यात येणार असून उपस्थिताना गोड जेवनाचा आग्रहपुर्वक आनंद घेता येणार आहे.

संत भगवान बाबावर गुलाबराव यांची अपार श्रद्धा असून दिवगंत भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुढें याच्यासह मुढें कुटुंबियाशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. विखे पाटील कुटुंबावरील त्याचे प्रेम वाखाणण्याजोगे असून ‘विकास कामे’ आणि ‘सामान्य जनता’ हेचं व्यसन असलेल्या निवृत्ती उर्फ गुलाबराव सांगळे या विरळ व्यक्तमत्वाला ६१ व्या अभिष्टचितंन सोहळ्यानिमित्त पुढील वाटचालीसाठी संगमनेर Live परिवाराकडून हार्दिक शुंभेच्छां.!

संकलन :- पत्रकार संजय गायकवाड
लेखन :- पत्रकार अनिल शेळके
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !