ना. विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाच्या आश्वासनानतंर सुरेश मांढरे यांचे उपोषण स्थगित

संगमनेर Live
0
◻️ आश्वी खुर्द येथे खाजगी हद्दीत ग्रामपंचायतीने गाळे बांधल्याचा केला होता आरोप

◻️ संगमनेर Live च्या वृत्ताची ना. विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून तात्काळ दखल

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेले व्यापारी गाळे हे सुरेश मांढरे यानी आपल्या हद्दीत बांधल्याचा खळबळजनक आरोप करत हे गाळे काढून घेण्यासाठी उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी याबाबतचे वृत्त संगमनेर Live वर प्रसिद्ध होताचं या वृत्ताची दखल घेत महसूलमंत्री ना. विखे पाटील यांचे स्वियं सहाय्यक डॉ. संजय कहार यानी स्थानिक पदाधिकारी व पुढाऱ्याच्या मदतीने सुरेश मांढरे याना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिल्यानतंर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

बुधवारी सुरेश मांढरे हे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले होते. सीटी सर्व्हे नंबर १८६ त्यामध्ये ग्रामपंचायत नंबर ३५९ व ३६० मध्ये ग्रामपंचायत आश्वी खुर्द यानी बेकायदेशीरपणे व्यापारी गाळे बांधले आहे. याबाबत मी ग्रामपंचायतीला वारंवार कल्पना दिली व त्या जागेची मोजणी केली. परंतू माझ्या जागेतील बेकायदेशीर बांधकाम ग्रामपंचायतीने काढले नाही किंवा त्याचा मोबदलाही मला दिलेला नाही. त्यामुळे बुधवार दि. २१ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपोषणकर्ते सुरेश मांढरे यानी दिली होती. 

याबाबत संगमनेर Live ने गुरुवारी हे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मांढरे हे उपोषणाला बसल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला मिळली. त्यामुळे माहिती मिळताचं तात्काळ ना. विखे पाटील यांचे स्वियं सहाय्यक डॉ. संजय कहार यानी उपोषणस्थळी येऊन सुरेश मांढरे यांची बाजू ऐकून घेतली. 

यानतंर त्यानी ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत सविस्तर माहिती घेऊन भूमि अभिलेख अहमदनगर यांच्या कार्यालयाकडून अहवाल आल्यानतंर ना. विखे पाटील यांच्याशी चर्चा करुन योग्य तो न्याय देण्याची ग्वाही उपोषणकर्ते सुरेश मांढरे याना दिली. त्यामुळे सुरेश मांढरे यानी दोन दिवसापासून सुरु असलेले आपले उपोषण स्थगित केले आहे.

दरम्यान यावेळी प्रवरा कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, माजी जिल्हापरिषद संदस्या सौ. कांचनताई मांढरे, सरपंच म्हाळू गायकवाड, ग्रामसेवक प्रविण इल्हे, माजी उप सरपंच संजय गायकवाड, निलेश भवर, कैलास गायकवाड, विजय भोसले, डॉ. लक्ष्मण भोसले, संतोष भडकवाड, मोहित गायकवाड, दिपक सोनवणे, मयुरेश शिदें आदिसह स्थानिक पदाधिकारी, पुढारी, कार्यकर्ते व मांढरे कुटुंबियाच्या उपस्थितीत लिबूं पाणी पिऊन मांढरे यानी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी उपोषणकर्ते सुरेश मांढरे यानी संगमनेर Live चे आभार मानले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !