◻️चालू गळीत हंगामासाठी २ हजार ३१३ रुपये दर केला जाहीर
◻️संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याना होणार फायदा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल पहिला खाजगी साखर कारखाना असलेल्या श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा सहावा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू झाला असून २०२२-२३ या चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रीक टन २ हजार ३१३ रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री गजानन महाराज साखर कारखान्याने मागील पाच गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडले असून दरवर्षी उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला आहे. २०२२-२३ साठी कारखाण्याची प्रति मेट्रीक टन एफआरपी २ हजार १०० रुपये आहे. परंतू ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर व नेवासा या तालूक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याना प्रति मेट्रीक टन २ हजार ३१३ रुपये दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतल्याचे रविंद्र बिरोले यानी म्हटले आहे.
दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदार यानी दाखवलेल्या विश्वासामुळे कारखाना यावर्षी उच्चांकी दर देण्याबरोबरचं विक्रमी गाळप करणार असल्याची ग्वाही देण्यात आली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यानी वाहतूकदार यांच्या मदतीने कारखान्याला आग्रक्रमाने ऊस गाळपासाठी देण्याला प्राधान्य द्यावे. असे आवाहन कारखाण्याचे चेअरमन रविंद्र बिरोले यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.