आश्वी खुर्दचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांचा पंचायत समितीकडून गौरव

संगमनेर Live
0
◻️ ‘कार्य गौरव’ पुरस्कारासह प्रमाणपत्र देऊन जिल्हा सत्र न्यायाधीक्षानी केला सन्मान

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील महत्वाच्या अशा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांना उत्कृष्ट कामगिरी करत असल्याबद्दल पंचायत समिती संगमनेरच्यावतीने प्रमाणपत्र व कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश मा. अमेठा, न्यायाधीश श्रीमती वाघमारे, शेख, बार कोन्सिलचे अध्यक्ष ढोमसे, गटविकास अधिकारी अनिल नागने, सहा. गटविकास अधिकारी वायाळ व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकासअधिकारी प्रवीण इल्हे हे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्यानी २०२२-२३ या अर्थिक वर्षात राष्ट्रीय लोक आदालत शिबिरात जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा केला असून १ लाख रुपयापेक्षा जास्त ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी असे उत्कृष्ट वसुलीचे कार्य केले आहे.  

दरम्यान पंचायत समिती संगमनेर यानी इल्हे यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्याना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवले असून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !