◻️ खांबे येथिल दुर्दैवी घटनेने खळबळ
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल
◻️ दोघे पोलीसाच्या ताब्यात
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील खांबे शिवारातील निहारवाडी येथिल काजल मच्छिंद्र वाघ (वय - २५) या विवाहित महिलेने सततच्या शारिरीक व मानसीक छळाला कटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात मुलीचे वडील यानी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत काजल वाघ हिचा १३ मार्च २०१८ रोजी खांबे येथिल मच्छिंद्र बाळासाहेब वाघ यांच्याशी विवाह झाला होता. सुरवातीचे पाच ते सहा महिने त्याचा संसार सुरळीत चालला. परंतू यानतंर वारवार पती मच्छिद्रं बाळासाहेब वाघ व सासू कुसुम बाळासाहेब वाघ हे किरकोळ कारणावरुन व माहेराहून वेळोवेळी पैसे आणावे यासाठी मयत काजलला शिविगाळ करणे, टोचूण बोलणे व मारहाण करत शारीरिक व माणसीक छळ करत होते. यामुळे मुलीचे वडील हे कधी १० हजार रुपये तर कधी २० हजार रुपये देत होते. मात्र मुलीचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यामुळे अनेकदा नातेवाईकानी एकत्रीत बैठका घेत समाजावून सांगितले होते.
दि. शनिवार दि. २१ जानेवारी रोजी रात्री पावने आकरा वाजेच्या सुमारास मयत काजल हिने पती मच्छिंद्र यांच्या मोबाईलवरुन वडीलाना फोन करुन मारहाण झाल्याची माहिती देत मला येथून घेऊन जा असे सांगितले होते. परंतू रात्र झाल्याने उद्या सकाळी येतो असे वडीलानी काजलला सांगितले.
रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी मुलीकडे जाण्यासाठी निघालेल्या वडीलाना जावई मच्छिंद्र याने सकाळी पावने आठ वाजेच्या सुमारास फोन करुन काजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे ते ही माहिती नातेवाईकाना देत घटनास्थळी दाखल झाले. याचंवेळी आश्वी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यानी मयत काजल हिच्यां मृतदेहाचा पंचनामा करत पुढील तपासणीसाठी काजलाचा मृतदेह लोणी येथिल प्रवरा ग्रामिण रुग्णालयात पाठवला होता.
दरम्यान आश्वी पोलिस ठाण्यात गुरंव नबंर १९/२०२३ नुसार भादंवी कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक आव्हाड हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून आश्वी पोलिसानी दोन आरोपीना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.