संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी सौ. दुर्गाताई तांबे व सौ. कांचनताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम सुरू असून जयहिंद महिला बचत गट व संगमनेर शहर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांति निमित्त महिलांसाठी खास तिळगुळ समारंभाच्या पार्श्वभूमीवर होम मिनिस्टर हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. जाणता राजा मैदान, संगमनेर या ठिकाणी न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात प्रामुख्याने सिने अभिनेते क्रांती (नाना) मळेगांवकर व बाल गायिका सह्याद्री मळेगांवकर हे सादरकर्ते असणार आहे.
दरम्यान याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, सामजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, सौ शरयूताई देशमुख, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी आदींसह विविध मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत.