◻️ दानशूर गोरक्षकांचा मदत्तीने उभारण्यात आलेल्या शेडचे होणार लोकार्पण
संगमनेर Live (योगेश रातडीया) | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील उज्ज्वल गोरक्षण केंद्र गोकुळ येथे जैन साध्वी प. पु .गुरुवर्या श्री कैवल्यरत्नाश्रीजी महाराज यांची भव्य महामांगलीक रविवार दि. २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या महामांगलीक व दानशूर गोरक्षकांचा मदत्तीने उभारण्यात आलेल्या शेडचे उध्दघाटनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प. पु. आचार्य श्री आनंदधन सुरीश्वरजी महाराज यांच्या सुशिष्या श्री मणिभद्रवीर उपासिका महामांगलिक प्रभाविका जैन साध्वी प. पु. गुरुवर्या कैवल्य रत्नाश्रीजी महाराज, पु. गुरु स्मृतिश्रीजी महाराज, पु. नमोतिर्थाश्रीजी महाराज यांच्या उपस्थितीत उज्ज्वल गोरक्षण केंद्र येथे रविवारी सकाळी ९ वाजता महामंत्रयुक्त महामांगलिकचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कैवल्यधाम तीर्थ परीवार, अशोकजी लोढा (राहाता), मोतीलालजी संकलेचा (वरखेडी), मनोज गुंदेचा (केडगाव), प्रदीप चोपडा (सोनई), आदेश्वर जैन मंदिर (सोनई), मनिभद्र जैन तीर्थ पेढी (आगलोड), सुमतीलाल भंडारी (संगमनेर), कमलेश संचेती (जुन्नर), डाॅ. वसंत बोरा (राहुरी फॅक्टरी), सुभाषजी सावज (राहुरी), संगीता चोपडा (साकुर), वसंतलालजी फिरोदिया (साकुर), कांतीलालजी धाडीवाल (पुणे), अतुलजी लुंकड(पुणे), अँड. लताजी बोरा (अहमदनगर) या दान दात्यांच्या योगदानातुन बांधण्यात आलेल्या शेडचे उध्दघाटन करण्यात येणार आहे.
दरम्यान या उध्दघाटन व महामांगलिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन कैवल्यधाम तीर्थ कोल्हार, आश्वी जैन श्रावक संघ, उज्ज्वल गोरक्षण केंद्र गोकुळ मांचीहिल तसेच संयोजकांनी केले आहे.