वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला नव्या संधी - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ मुंबई ते शिर्डी रेल्वे सुविधेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तें मुंबई येथून प्रारभं

◻️ अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व

संगमनेर (शिर्डी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला नव्या संधी निर्माण होतील आणि या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे  सुविधेचा प्रारंभ शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई येथून झाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पद्मश्री पोपटराव पवार खा. डॉ. सुजय विखे पाटील माजी मंत्री आ. राम शिंदे आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

शिर्डीसह जिल्ह्य़ातील अन्य तिर्थक्षेत्रांकरीता अतिशय महत्पूर्ण ठरणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा झालेला शुभारंभ उत्तर महाराष्ट्राच्या तिर्थक्षेत्र पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब आहे. मुंबई येथून ही रेल्वे सुरू करावी आशी मागणी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री यांच्यकडे केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे समाधान व्यक्त करतानाच एकाचवेळी राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणे राज्याच्या इतिहासात मोठी बाब असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

कोव्हीड संकटानंतर मेक इन इंडीया या संकल्पनेतून तसेच स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशातील महत्वपूर्ण राज्यांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की उत्तर महाराष्ट्रातील नासिक त्र्यंबकेश्वर वणी शिर्डी शनि शिंगणापूर या तिर्थक्षेत्रांना येणाऱ्या भाविकांचा प्रवास अतिशय कमी वेळात होईल.

भाविकांची वर्दळ वाढल्यास पर्यटन वाढेल आणि तिर्थक्षेत्रांच्या स्थानिक अर्थकारणाला पाठबळ मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

नगर जिल्ह्यत पर्यटनाच्या दृष्टीने नव्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. तिर्थक्षेत्र पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचे कामही प्रशासकीय स्तरावर सुरू झाले असतानाच नगर जिल्ह्याच्या मागणीचा विचार करुन केंद्र सरकारने मुंबई शिर्डी रेल्वे सुरू करण्याच्या मागणीची पूर्तता होणे हे जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व ठरणार आहे. 

या रेल्वेच्या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून  जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने निर्माण करून दिलेल्या संधीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यातील नगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्याकरीता वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्या  नगर प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील आळंदी पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट सिध्देश्वर या तिर्थक्षेत्रांकरीता ही रेल्वे सुविधा मोठी उपलब्धी असल्याने दोन्ही जिल्हयांचा पालकमंत्री म्हणून केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचा मला व्यक्तिशा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !