◻️ आश्वी येथे खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्तें वयोश्री योजनेतील विविध साधन साहित्याचे वितरण
◻️ जोर्वे आणि आश्वी गटातील २६ गावातील ६ हजार नागरीकांनी या योजनांचा लाभ
संगमनेर Live | महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बद्दल होत असून लोकाभिमुख कामातून मागील काळात जे झाले नाही ते सध्या विविध योजनेतून होणार आहे. पुढील महिन्यात शासन आपल्या द्वारी उपक्रमात रेशन कार्ड, विविध योजनाची नोंदणी सुरु करत असतातच शेत जमिनीच्या मोजणीसाठी विशेष मोहीम सुरू होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी मतदार संघात सामाजिक न्याय आणि अधिकर्ता मंत्रालय भारत सरकारच्यावतीने आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेतील जेष्ठ नागरीकांसाठी विविध साधन साहित्य वितरण कार्यक्रमात खा. डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. भाजपाचे संगमनेर तालुका अध्यक्ष सतीषराव कानवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अँड. रोहीणीताई किशोर निघुते, प्रवरा बॅकेचे अध्यक्ष अशोकराव म्हसे, डॉ. दिनकर गायकवाड, विनायकराव बालोटे, जेष्ठ नेते भगवानराव इलग, विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, जेष्ठ नेते रंभाजी इलग, संचालक शिवाजीराव इलग, पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, भागवत उंबरकर, जेऊरभाई शेख, हरिभाऊ ताजणे, भाजप किसान मोर्चाचे अशोक जऱ्हाड, भाऊसाहेब सांगळे, रावसाहेब घुगे, मकरेद गुणे, ज्ञानदेव वर्पे, ज्ञानदेव पर्वत, गौतमराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्व समावेश काम सुरु आहे. कोविड लसीकरण, मोफत धान्य योजनामुळे हे सरकार लोकाना आपले वाटत आहे. दुरदृष्टीने देशाचा विकास होत आहे. देशातील प्रत्येक नागरीकाला यातुन आत्मविश्वास मिळत आहे.
मागील महसूल मंत्र्यानी काय केले ? यापेक्षा वेगळे काम सध्या महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे करत आहे. महसूलच्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी हा उपक्रम’ एप्रिल महिन्यामध्ये सर्वच जमीनीची मोजणी अभियान सुरू करून पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करणार आहे. कुणी किती गडबड करा, विरोध करा पण जे संस्कार प्रवरा परिवारांचे आहेत ते पुढे जात असतांना सर्वसामान्य जनतेच आशिर्वाद हेच आमचे अस्त्र आहे. आपला विश्वास कामाची प्रेरणा देणारा आहे असे खा. डॉ. विखे पाटील यानी सांगितले.
प्रारंभी अँड. रोहीणीताई निघुते यांनी प्रास्ताविकांत जोर्वे आणि आश्वी गटातील २६ गावामध्ये ६ हजार नागरीकांनी या योजनांचा लाभ मिळाला. याशिवाय बांधकाम कारागिरांसाठी मध्यांन भोजन, राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत विविध गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याचे सांगताच २६ गावांमध्ये विकासाचे नवे मॉडेल उभे राहत असल्याने सांगितले. यावेळी जेष्ठ नागरीकांना विविध साहित्याचे वितरण मान्यवरांनी केले. तर आभार अशोक तळेकर यांनी मानले.
मंत्रीमंडळ बैठकीत निळवंडे धरणासाठी शासनाने ५ हजार १७७ कोटी रुपये दिल्याबद्दल निळवंडे कालवे लाभार्थ्याच्या वतीने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आहे.