◻️ राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून संगमनेर शहरातील १६३५ जेष्ठ नागरीकांना साधन साहित्याचे वितरण
◻️ मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते तालुक्यातील ५१५ घरकुलांचे ऑनलाईन भुमिपुजन
◻️ सायकलपटू प्रणिता प्रफुल्ल सोमण हिला पुढील प्रशिक्षणासाठी ५ लाख रुपये
संगमनेर Live | विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता केंद्र आणि राज्य सकराच्या योजनांचा लाभ नागरीकां पर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सध्या राज्यात भविष्यकार खूप तयार असल्याने सरकारच्या भविष्याबाबत केली जाणारी वक्तव्य फक्त प्रसिध्दीचा सटंट असल्याची टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना आधार देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरु आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकांसाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यात समाधान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून संगमनेर १६३५ शहरातील जेष्ठनागरीकांना मंजूर झालेल्या सहायक साधन साहित्याचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जेष्ठसामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठनेते वसंतराव गुंजाळ, वसंतराव देशमुख, बापूसाहेब गुळवे, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, उपाध्यक्ष जावेद जहागिरदार, महिला अध्यक्षा प्राजक्ता बागुल, अमोल खताळ, रविंद्र थोरात, बापू देशमुख, अशोक कानवडे, संदीप देशमुख, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते तालुक्यातील ५१५ घरकुलांचे प्रातिनिधीक स्वरुपात ऑनलाईन भुमिपुजन करण्यात आले. तसेच अकलापूर येथील विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या बर्डे कुटूंबीयांना मंजूर झालेल्या घरकुलाचे पत्रही देण्यात आले. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ तालुक्यातील ६ हजार लोकांना मिळणे ही पहिल्यांदाच घटना घडत आहे. देशातील ज्येष्ठ नागरीकांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी या योजनेची सुरुवात केली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील ४२ हजार लाभार्थ्याना या योजनेचा थेट लाभ मिळाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
केंद्र सरकार मागील आठा वर्षापासून विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना आधार देत आहेत. समाजातील शेवटचा माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु असलेले काम हे केवळ विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून, कोव्हीड संकटातही देशाच्या पाठीशी भक्कमपणे मोदीजींचे नेतृत्व उभे होते. जगातील इतर देशांची अवस्था पहाता या संकाटातून देश वाचविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानून मोफत लसिकरण आणि मोफत धान्य योजनेमुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
आयुष्यमान भारत योजनेपासून ते ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. २०५० सालापर्यंतचे नियोजन करुन प्रत्येक गावातील घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांचे काम गावोगावी सुरु झाले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारनेही मागील ६ महिन्यात सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लम्पी संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनावरांचे मोफत लसिकरण करण्यात आले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकारची यशस्वी वाटचाल सुरु असून, या सरकारच्या कामामध्येच विरोधकांना आता धडकी भरली असल्याची टिका त्यांनी केली.
सरकारच्या संदर्भात विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या बेछूट वक्तव्यांची खिल्ली उडवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विरोधकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. सरकार पडण्याच्या रोज तारखा ते देत आहेत. परंतू हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करुन आगामी काळातही भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीचेच सरकार राज्यात यशस्वीपणे काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णाताई मालपाणी यांनी वयोश्री योजनेच्या प्रभावीपणे झालेल्या अंमलबजावणीचे कौतूक करुन या योजनेचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी विखे पाटील परिवाराने केलेल्या प्रयत्न महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. याप्रसंगी वसंतराव गुंजाळ, श्रीराम गणपुले यांचीही भाषणे झाली.
संगमनेरची सायकलपटू प्रणिता प्रफुल्ल सोमण हिला पुढील प्रशिक्षणासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देवून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने तिच प्रायोजकत्व स्विकारले आहे. या मदतीचा धनादेश डॉ. सौ. स्वाती सुमन यांना मंत्री विखे पाटील यांनी प्रदान केला.