◻️ प. पू. गुरुमाऊली यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त ‘जनसेवा अभियान’
संगमनेर LIVE (लोणी) | ‘धर्म की जय हो.. अधर्म का नाश हो’ ‘प्राणिओ मै सद्यभावना हो.. विश्व हा कल्याण हो’ हा संदेश श्री त्रंबकेश्वर गुरुकुल पिठाचे पीठाधीश प. पू. गुरुमाऊली यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त देशात देशात विदेशात जनसेवा अभियान गेले सात दिवस राबविण्यात आला.
यामध्ये दुर्गापूर आणि चिंचपूरच्या सेवा केंद्रातील सेवेककरी यांनी अन्नदान, वस्त्रदान रुद्र पाठ, सप्तशती, स्वामी चरित्र पाठ घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दुर्गापुर आणि चिंचपूर येथिल सेवेकर्यांनी धनगरवाडी या आदिवासी भागात आज वस्त्रदान केले. यामध्ये प्रत्येक बहिणीला एक साडी देण्यात आली. तसेच प. पू. गुरुमाऊलींचे कार्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रावसाहेब शेजुळ, सौ. शितलताई जाधव, सौ. सुरेखा तांबे, सौ. ताई शेजुळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावातील असंख्य महिला भगिनीसह आ. विखे पाटील वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह अनेक सेवेकरी उपस्थित होते. विज्ञान आणि अध्यात्मिक कार्यातून सेवा मार्गातून शेतीशास्र, विविध देव - देवतांच्यासेवा, बालसंस्कार, ग्रामअभियान, व्यसनमुक्ती, विवाह संस्कार आदी उपक्रम सुरु असतात. यावेळी मुलांना खाऊ वाटप ही करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत तांबे यांनी केले.