◻️ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आश्वी बुद्रुक बाजारतळावर आयोजन
संगमनेर LIVE | अश्विन सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल मांचीहिल व नामको कॅन्सर हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ या संकल्पनेतून भव्य कॅन्सर निदान शिबीराचे आयोजन डॉ. राजन कुलकर्णी यांचे क्लिनिक आश्वी बुद्रुक बाजारतळावर गुरुवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे.
स्त्रियांसाठी गर्भाशय व स्तनांच्या कॅन्सर निदानासाठी आश्वी बुद्रुक येथे मोफत शिबीर आयोजित केलेले आहे. या शिबीरात स्त्रीयांच्या विकारांची स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी केली जाईल. गर्भाशय मुखाचा कॅन्सर निदानासाठी पॅप स्पिअर मोफत घेतले जातील. तसेच अँनेमिया (शरिरातील रक्त कमी होणे) यासाठी हिमोग्लोबिन मोफत तपासून रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या जातील.
तरी २० वर्ष व त्यावरील स्त्रीयांनी या शिबीरात तपासणी करून घ्यावी. तसेच नावनोंदणी स्त्रीयांनी आश्वी बुद्रुक येथील क्लिनिकमध्ये करुन घ्यावी. शिबीरासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
नाशिक येथील कॅन्सर तज्ञ डॉ. श्रद्धा वाळवेकर व त्यांचे सहकारी डॉक्टर्स हे स्त्रीयांची तपासणी करणार आहेत. कॅन्सर आजाराची लक्षणे नसलेल्या वयाच्या २० वर्षानंतरच्या सर्व स्त्रीयांनी या शिबीरात तपासणी करुन आपल्याला कॅन्सर नाही ना याची खात्री करून घ्यावी. असे आवाहन आयोजकानी केले आहे.