◻️ श्रीराम मंदीरात दररोज होणार रामविजय ग्रंथाचे पारायण
◻️ भव्य बैलगाडा शर्यतीसह विविध धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन
◻️ बालकिर्तणकार ह. भ. प. माऊली महाराज जाहुरकर यांच्या किर्तणाची पंचक्रोशीतील भाविकाना उत्सुकता
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून (दि. २२ मार्च) येणाऱ्या हनुमान जयंतीपर्यत (दि. ६ एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमासह भव्य बैलगाडा शर्यत व रक्तदान शिबिराचे आश्वी बुद्रुक ग्रामस्थानी आयोजन केले असल्याची माहिती मिळाली आहे. याकाळात दररोज रामविजय ग्रथाचे पारायण ह. भ. प. राऊत महाराज करणार आहेत
गुरुवार दि. ३० मार्च रोजी येथिल श्रीराम मंदिरात प्रभु श्रीराम जन्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सकाळी ८ वा. प्रभुराम पादुका पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. यानतंर भजनाचा कार्यक्रम व दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. दुपारी २ ते ५ या कालावधीत भव्य बैलगाडा शर्यतीसह सायं ६ वाजता भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता झी टॉकीज फेम बालकिर्तनकार हभप माऊली महाराज जाहुरकर यांचे समाजप्रबोधनपर किर्तण व त्यानतंर उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे आश्वी बुद्रुक ग्रामस्थाकडून वाटप केले जाणार आहे.
दरम्यान दि. ३० व ३१ मार्च रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यत अर्पण ब्लड सेटंरकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या उत्सव काळात आश्वी बुद्रुक येथिल नागरीकासह पंचक्रोशीतील भाविक भक्तानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक व ग्रामस्थानी केले आहे.