◻️ महिलाना मानसिक व शारीरिक त्रासाचा करावा लागतोय सामना
◻️ ना. विखे पाटील यांना ग्रामपंचायतीचे निवेदन
संगमनेर Live | अवैध दारु विक्रीमुळे मानसिक व शारीरिक त्रासाला कटांळलेल्या २०० ते २५० महिलानी संगमनेर तालुक्यातील खांबे येथिल ग्रामपंचायतीवर अवैध दारु विक्री बंद व्हावी यासाठी नुकताच मोर्चा काढत आपली कैफियत माडली होती.
यावेळी उपस्थित महिलानी खांबे गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु असल्याचे म्हणत २६ जानेवारी रोजी ही अवैध दारु विक्री बंद व्हावी याबाबत ठराव केला होता. मात्र आद्यपही दारु विक्री सुरुचं असल्याने आक्रमक झालेल्या या महिलानी ग्रामपंचायतीवर नुकतांच मोर्चा काढला होता.
यावेळी महिलानी व्यसनाधिनतेमुळे संसार देशोधडीला लागत असून रोजनदारी करुन मिळवलेले पैसै ही दारु पिण्यासाठी हिसकावले जात असल्याचे म्हणत या अवैध दारु विक्रीला जबाबदार कोण? हा प्रश्नं उपस्थित केला आहे. तर घरची व बाहेरची सर्व जबाबदारी स्वता:च्या खांद्यावर पेलणाऱ्या महिलानी शारीरिक व मानसिक त्रासाला कटांळून जगावे की मरावे? असे म्हणून न्याय मागायचा कोणाकडे हा सवाल विचारला आहे.
दरम्यान पुढील आठ दिवसात ही अवैध दारु विक्री बंद न झाल्यास आश्वी पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा या महिलानी दिला आहे. यावेळी उपस्थित आश्वी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी अवैध दारु विक्री बंद करण्याचे आश्वासन या महिलाना दिले असून नव्याने आश्वी पोलीस ठाण्यात हजर झालेले पोलीस निरिक्षक संतोष भंडारे या अवैध दारु विक्रीबाबत कोणते धोरण घेतात याकडे नागरीकाचे लक्ष लागले आहे.
ना. विखे पाटील यांना ग्रामपंचायतीचे निवेदन..
खांबे गावात सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद व्हावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील याना सरपंच रविंद्र दातीर यानी निवेदन दिले असून ही अवैध दारु विक्री बंद व्हावी यासाठी प्रशासनाला सुचना करण्याची विनंती केली आहे. तसेच हे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क व आश्वी पोलीस ठाणे येथे पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे.