आश्वी खुर्द येथिल प्रवरा उजव्या कालव्याला जोडलेल्या पाटचारीचे काम पुर्णत्वास

संगमनेर Live
0
◻️ ना. विखे पाटील यांचे लाभधारक शेतकरी व ग्रामस्थानी मानले आभार

◻️ पाटपाण्याचा शेकडो शेतकऱ्याना होणार फायदा

संगमनेर LIVE | राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा उजव्या कालव्याला जोडलेल्या पाटचारी नबंर ९ चे दुरुस्तीचे काम पुर्णत्वास गेल्यामुळे या चारीवर पाण्यासाठी अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यानी समाधान व्यक्त करत ना. विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

आश्वी खुर्द येथिल प्रवरा उजव्या कालव्याला जोडलेल्या पाटचारी नबंर ९ ची मागील अनेक दिवसापासून दुरावस्था झाली होती. त्यामुळे कालव्याला आवर्तण येऊनही शेकडो शेतकऱ्याना शेताला पाणी भरण्यास अडचणी येत होत्या. या चारीच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळवण्यासाठी मोठी अडथळ्याची शर्यत करावी लागत असे. त्यामुळे गावातील जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यानी ना. विखे पाटील याच्यां नजरेस ही बाब आणून दिल्यामुळे ना. विखे पाटील यानी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून या चारीच्या कामाबाबत योग्य त्या सुचना आपल्या यंत्रणेला दिल्या होत्या.

त्यानुसार आश्वी खुर्द येथिल अत्यत दयनीय अवस्था झालेल्या चारी नबंर ९ चे काम जलद गतीने पुर्ण करण्यासाठी उप कार्यकारी अधिकारी थोरवे, सोनगाव सिचन शाखा अधिकारी सुरुंगकर तसेच सुलाश शिरोळे यांच्यासह मुकुंद जोशी, युवराज नागरे आदिनी या ठिकाणी येऊन चारीचे काम केले. 

दरम्यान यासाठी जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले, कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, मकरंद गुणे, बाळासाहेब मांढरे, सरपंच म्हाळू गायकवाड, अँड. अनिल भोसले, सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर खर्डे, दत्तात्रय बापूसाहेब गायकवाड, प्रशांत कोडोलीकर, सुरेश मोरे, डॉ. प्रणव गुणे, प्रकाश सोनवणे, गोवर्धन सोनवणे, अरुण दरेकर, संतोष गोसावी आदिसह जनसेवा मंडळाच्या जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यानी वेळोवेळी केलेल्या सुचनानुसार या चारीचे काम पुर्ण करण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यानी समाधान व्यक्त करत ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !