पारदर्शक व विकासाभिमुख कामामुळे केंद्र व राज्यातील सरकार जनतेचे ठरले - सौ. विखे

संगमनेर Live
0
◻️ गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पार्श्वभूमीवर प्रतापपूर येथे ‘आनंदाचा शिधा’ वितरण

◻️ अवैध वाळू व्यवसायाला लगाम घातल्यामुळे ग्रामीण भागातील दशहत झाली कमी 

◻️ विकास कामे व वैयक्तीक योजना यामुळे शिर्डी मतदार संघ राज्यात विकासात अव्वल

संगमनेर LIVE | प्रत्येकाच्या पोटाला अन्न आणि शुद्ध पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. मोफत धान्य,  मध्यान्ह भोजनासह व्यक्तिगत  लाभाच्या योजनेतून सर्व सामान्यांना  आधार दिला जात आहे. पारदर्शक आणि विकासाभिमुख कामामुळे केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे ठरले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

राज्य सरकारच्या वतीने गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यत आनंदाचा शिधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय करण्यात आला. त्यानुसार शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे आनंदाच्या शिधा कीट वाटपाचा कार्यक्रम सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दगडू तथा अप्पासाहेब आंधळे होते. 

याप्रसंगी ट्रक वाहतूक सोसायटीचे माजी संचालक व जेष्ठ नेते भगवानराव इलग, सेवा सोसायटीचे अध्यक्ष गजानन आव्हाड, उपाध्यक्ष सखाराम आंधळे, तटांमुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, संचालक शिवाजीराव इलग, सरपंच दत्तात्रय आंधळे, उपसरपंच शोभा आंधळे, सिधूताई इलग, हरिभाऊ आंधळे, दादा आंधळे, दिलिप आंधळे, एकनाथ सांगळे, दादा इलग, अशोक बिडवे, सौ. रुक्मिनीबाई आंधळे, सौ. शांताबाई गिते, संदिप उनवणे, दत्तात्रय आंधळे, संगिता आव्हाड, सुखदेव आव्हाड, माजी प्राचार्य रामदास गिते, जनार्धन डोगंरे, भिकाजी सांगळे, शंकर खामकर, बबनराव घुगे, आशाताई सांगळे, पुरवठा अधिकारी भालेराव, प्रभाकर आंधळे, रामदास गिते, सुखदेव आंधळे, सुरेशराव इलग यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी वैयक्तीक लाभाच्या योजनांचे वयोवृध्द नागरीकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. राष्ट्रीय वयोश्री योजना, मोफत धान्य, कोविड काळात जनतेला दिलेला विश्वास आणि मोफत लसीकरण यामुळे सर्वानाच मोठा आधार मिळाला. 

राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताचे निर्णय होत आहे. मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री म्हणून काम करतांना वेगवेगळे दाखले एकाच अर्जावर देण्याचा निर्णय करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. 

वाळूचे धोरण घेवून अवैध वाळू व्यवसायाला लगाम घातला असल्याकडे लक्ष वेधून, ग्रामीण भागातील पुर्वीची दशहत आता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतांना विविध योजनांची अंमलबजावणी पारदर्शक पणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याचे योगदान महत्वपूर्ण  असल्याचे सौ. विखे यानी सांगितले. 

यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना जेष्ठ नेते भगवानराव इलग यांनी शिर्डी मतदार संघातील विकास कामे व वैयक्तीक योजना यामुळे शिर्डी मतदार संघ राज्यात विकासात अव्वल ठरला असल्याचे सांगितले.

दरम्यान याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात सौ. नवसाबाई घुगे, सौ. बेबी बिडवे, रामनाथ गोसावी, लहानबाई मोरे, तुकाराम गिते, यशवंता इलग, अशोक खामकर, गंगाराम सांगळे, लता माळी, पांडुरंग माळी व विलास आंधळे या लाभार्थ्याना आनंदाचा शिधा कीटचे सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब इलग यानी केले व आभार गजानन आव्हाड यांनी मानले. यावेळी आनंदाचा शिधा मिळाल्यामुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहतं असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !