◻️ संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील घटनेने खळबळ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वडदरा (केळेवाडी) येथे बिबट्याने थेट घरात घुसून एकाला ठार केले आहे. ही घटना शनिवार (दि. २२) एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान घडली. उत्तम बाळाजी कुर्हाडे (वय - ६३) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथे उत्तम कुर्हाडे हे होते. रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान ते आणि त्यांची आई कासाबाई हे दोघेजण घरात होते. त्याच दरम्यान बिबट्याने थेट घरात घुसून कुर्हाडे यांच्यावर हल्ला केला होता. त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली कासाबाई यांनी घराच्या बाहेर येवून जोरजोराने आरडा-ओरडा केल्याने त्यामुळे आजूबाजूला असलेल्या भावबंधांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली होती.
दरम्यान काहींनी या घटनेची माहिती मोबाईलवरून घारगाव पोलिस व वनविभागाला दिली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने थेट घरात घुसून उत्तम कुर्हाडे यांना ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.