◻️ प्रथितयश उद्योजक ज्ञानेश्वर आंधळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.!!
संगमनेर LIVE | जिद्द व चिकाटी असेल तर काहीही साध्य होऊ शकते हे दाखवून दिलं आहे, संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथिल प्रथितयश उद्योजक ज्ञानेश्वर विठ्ठल आंधळे यानी. १ हजार ५०० लिटर दूधापासून सुरु केलेला दूध चिलिंग उद्योग आज प्रतिदिन ३२ हजार लिटर प्रमाणे सुरु असला तरी लवकरच तो प्रतिदिन ५१ हजार लिटर चिलिंग करण्याचा मानस असल्याने यातून पंचक्रोशीतील दूध उत्पादक व शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळेचं एक यशस्वी उद्योजक म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक त्यानी मिळवला आहे. आज १ मे रोजी उद्योजक ज्ञानेश्वर आंधळे यांचा ५४ वा वाढदिवस असल्याने वाढदिवसाच्या पुर्व संध्येला संगमनेर LIVE ने त्याना बोलत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दलचा हा लेख प्रपंच..
प्रतापपूर येथिल ज्ञानेश्वर आंधळे यांचा शेतकरी कुटुंबातील वडील विठ्ठल सावळेराम आंधळे व आई जनाबाई विठ्ठल आंधळे यांच्या पोटी १ मे १९६९ साली जन्म झाला होता. त्याना चार भाऊ व दोन बहिनी आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे कष्ट करण्याचे बाळकडू लहानपणी त्याना घरातूनचं मिळाले होते. बालपणापासूनचं नवनवीन गोष्टी शिकण्याची व अंगिकारण्याची सवय ज्ञानेश्वर आंधळे यांच्याकडे असल्याने विविध विषयाबरोबरचं विविध क्षेत्रातील ज्ञानाबाबत त्याचा हातखंड वाढत होता.
माध्यमिक व उच्च शिक्षण पुर्ण झाल्यानतंर त्यानी डेअरी डिप्लोमाची पदवी संपादित केली. यानतंर बाभळेश्वर दूध संघात गुण नियत्रंण अधिकारी म्हणून १५ वर्ष तर प्रभात डेअरीत १ वर्ष चागल्या पदावर काम केले. परंतू हाडाच्या शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ज्ञानेश्वर आंधळे यानी दर्जेदार दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दूधाला चागला भाव मिळवा व गावातील तसेच परिसरातील तरुणाना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी २०११ साली प्रतापपूर शिवारातील दाढ - आश्वी रस्त्यावर श्री समर्थ मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट नावाने चिलिंग प्लांट अवघ्या १ हजार ५०० लिटर दूधावर सुरु केला होता.
प्रतापपूर सारख्या खेड्यात त्यावेळी खाजगी दूध चिलिंग प्लांट सुरु झाला यावर कोणाचाही प्रथमत: विश्वासचं बसत नव्हता. १५०० लिटर दूधापासून सुरुवात केलेला व्यवसायाला गुणवत्ता, चांगला भाव, विश्वास यांच्या जोरावर आज ३२ हजार लिटर प्रतिदिन चिलिंग प्रोसेसिंगवर नेवून ठेवला आहे. या २२ वर्षाच्या व्यवसाय प्रवासाला त्यांनी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण आधुनिकतेचीही जोड दिली आहे.
जिद्दीच्या जोरावर सुरु केलेल्या या उद्योगाने दिवसेंदिवस शेतकऱ्यानमध्ये विश्वास निर्माण करताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या शेकडो हाताना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. प्रतापपूर सारख्या खेड्या गावातील ज्ञानेश्वर आंधळे यांच्या श्री समर्थ मिल्क अँण्ड मिल्क कडून फ्रान्स येथिल नामकिंत लँक्टलिस कंपणीला दूध पुरवठा होत असल्याने ही प्रतापपूर सारख्या गावातील नागरीकानसाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. हे सांगताना मात्र त्याच २० वर्षाचा संघर्ष त्यांना आठवल्याने आनंदश्रुनी डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या.
दरम्यान व्यवसाय करत असताना आंधळे यानी आपल्या शेतीकडे दुर्लक्ष होऊ न देता या शेतीला कुटुंबियाच्या मदतीने आधुनिकतेची जोड दिली. त्यामुळे प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्याचा पंचक्रोशीत लौकीक असल्याची माहिती त्याच्या मित्र परिवार व प्रतापपूर ग्रामस्थानी दिली आहे. आईचे निधन झाले असले तरी ९३ वर्षाच्या वडीलाची सेवा करण्याबरोबरचं साधु संताची सेवा करण्यासाठी ते नियमित वेळ काढत असतात.
आपल्या या कार्यात पत्नी चंद्रकला आंधळे या नेहमी पाठीशी खंभीर उभ्या राहत असल्याचे त्यानी सांगितले. मुलगा शुभम व मुलगी जुई याना उच्च शिक्षण देऊन भावी पिढी उभे करण्याचे काम केले आहे. तसेच बंधू दिनकरराव आंधळे व राहुल डुकरे यांच्या भागीदारी व सहभागामुळे श्री समर्थ मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट यशाचे नव-नवे शिखर सर करत असल्याच्या भावना आंधळे यानी व्यक्त केल्या आहेत.
ज्ञानेश्वर आंधळे यांचा गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी मोलाचा सहभाग असतो. समाजाच्या कामासाठीची तप्तरता, जिद्द, चिकाटी व मदतीसाठी सदैव तयार असणारे यशस्वी उद्योजक मा. श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल आंधळे यांना ५४ व्या वाढदिवसानिमित्त संगमनेर LIVE परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छां..!
साहेब.., प्रतापपूर ग्रामस्थाप्रमाणे आम्हालाही उद्योजक म्हणून तुमचा सदैव आभिमान राहिल.
संकलन :- संजय गायकवाड, 9850981485
लेखन :- अनिल शेळके, 9503552057