◻️ पिपळगाव देपा गणातील शिवसेनेचा ढाण्या वाघ अखेर निद्रिस्त
संगमनेर LIVE | पिपळगाव देपा पंचायत समिती गणात शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गण प्रमुख तसेच ढाण्या वाघ म्हणून प्रसिध्द असलेले संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथिल सामाजिक कार्यकर्ते कैलास साहेबराव पाटोळे (वय - ४५) यांचे रविवारी सांयकाळी झालेल्या अपघातात निधन झाल्यामुळे पिपळगाव देपा सह वरवंडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वरंवडी फाट्यावरुन गावाकडे दुचाकीवरुन कैलास साहेबराव पाटोळे हे चालले होते. यावेळी ते भोसले वस्ती याठिकाणा लगतहून जात असताना समोरुन येणाऱ्या ट्रँक्टरने त्याना जोरदार धडक दिली. त्यामुळे पाटोळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकाना पाटोळे याना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हालवले होते, मात्र उपचारापुर्वीचं कैलास पाटोळे यांची प्राणज्योत मालवली होती.
लहानपणापासूनच कैलास पाटोळे हे शिवसेनेत सक्रिय होते. पठार भागात शिवसेनेचे संघटन वाढविण्यासाठी त्यानी अहोरात्र मेहनत घेतली होती. तर वरवंडी गावाच्या विकास कामातही ते नेहमी मोलाच सहकार्य करत होते. त्याच्या निधनाची माहिती मिळताचं जुन्या जाणत्या शिवसैनिकानी शोक भावना व्यक्त केल्या आहे.
दरम्यान पाटोळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय, चुलते असा मोठा परिवार असून सोमवारी दुपारच्या सुमारास वरंवडी येथिल स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. याप्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवंरासह पंचक्रोशीतून आलेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.