◻️ अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
संगमनेर LIVE (लोणी) | सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रवरा परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थाच्या कार्यालयात पुण्यतिथी निमित्ताने पद्मश्रीच्या अभिवादनाचे कार्यक्रम संपन्न झाले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळास महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू यांच्यासह संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. लोणी बुद्रुक येथील अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, किसनराव विखे, संपतराव विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, राहुल धावणे, नवनित साबळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे दि.२७ एप्रिल ते शुक्रवार दि.५ मे २०२३ या कालावधीत लोणी बुद्रुक ग्रामस्थांचे वतीने अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत वीणा पूजन करून गाथा पारायण सोहळ्याची सुरूवात करण्यात आली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात पद्मश्री विखे पाटील यांना अभिवादन केले याप्रसंगी एम. बी अंत्रे, माजी उपसरपंच अनिल विखे, राहुल धावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्वच शाळा महाविद्यालयामध्ये तसेच प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादनाचे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.