◻️ ना. विखे पाटील यांच्या जनसेवा तर आ. थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाची प्रतिष्ठा पणाला
◻️ ना. विखे गटाकडे बहुमत असूनही राजकीय कट शहाच्या राजकारणात सरपंच पद आ. थोरात यांच्या गटाकडे
◻️ दोन जागासाठी चार उमेदवार रिगंणात
◻️ निवडून आलेल्या ‘त्या’ जागा सरपंच पदाचे भवितव्य ठरवणार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या व राजकीय दृष्टया महत्वाच्या असलेल्या शिबलापूर ग्रामपंचायतीच्या दोन जागासाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणूकीसाठी उद्या गुरुवार दि. १८ मे २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही पोट निवडणूक सरपंच पदाचे भवितव्य ठरवणार असल्याने ना. विखे पाटील व आ. थोरात गटाच्या कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.
ही पोटनिवडणूक लागण्यापुर्वीचा घटनाक्रम..
शिबलापूर ग्रामपंचायतीवर ना. विखे पाटील यांच्या गटाची बहुमताची सत्ता होती. सुरवातीला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे सरपंच सचिन गायकवाड यानी काही महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला होता.
ग्रामपंचायत कार्यलयात निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असता ना. विखे पाटील गटाकडून सचिन विनायक गायकवाड व शुंभागी दिपक रक्टे यानी तर आ. थोरात गटाकडून प्रमोद बोद्रें यानी सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीत तीनही अर्ज राहिल्यानतंर विखे गटाच्या सचिन गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ना. विखे पाटील गटाचे ७ सदंस्य तर आ. थोरात गटाच्या ३ सदंस्यानी गुप्त पद्धतीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भाग घेतला. याआधी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्यामुळे दोन्ही उमेदवाराना सम-समान म्हणजे ५ मते पडली. त्यामुळे सरपंच पदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार यानी वरीष्ठाशी चर्चा करुन देव चिठ्ठी टाकून निर्णय घेण्याचे जाहीर केले. यावेळी ४ वर्षाच्या मुलाच्या हस्तें सरपंच पदाची चिठ्ठी काढली असता त्यामध्ये प्रमोद बोद्रें यांचे नाव निघाल्यामुळे त्यावेळी त्याना सरपंच घोषित करण्यात आले होते.
त्यामुळे शिबलापूर ग्रामपंचायतीत ना. विखे पाटील गटाचे बहुमतासाठी आवश्यक ७ ग्रामपंचायत सदंस्य ना. विखे गटाकडे असतानाही विरोधी गटाचे प्रमोद बोद्रें हे गुप्त मतदान प्रक्रियेत सरपंच पदी निवडून येणे हे दुर्दैव असल्याची भावना त्यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यानी व्यक्तं केली होती.
याचं दरम्यानच्या काळात राजकीय सत्ता नाट्याच्या पुलाखालून बरेचं पाणी वाहून जात असताना ना. विखे पाटील गटाच्या सदस्यावर अपत्य नियमानुसार पदमुक्त करण्यात आले. तर एक सदंस्य मृत झाल्याने प्रभाग २ व प्रभाग ४ अशा दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे नुकतीचं प्रशासनाकडून पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून दोन जागासाठी ४ उमेदवार रिगंणात उतरले आहेत. प्रभाग दोन मध्ये ना. विखे गटाचा सदस्य आपत्य नियमानुसार अपात्र ठरला असून याठिकानी मतदार संख्या ही ७१६ आहे. तर प्रभाग ४ मध्ये आ. थोरात गटाचा सदंस्याचे निधन झाले असून याठिकानी मतदार संख्या ही ७८६ असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान प्रभाग दोन मधून ना. विखे पाटील गटाकडून वैष्णवी महेंद्र जगताप विरुआ आ. थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे तसेच प्रभाग क्रमांक ४ मधून सपना प्रदीप मुन्तोडे विरुध्द शेतकरी मंडळाच्या करुणा सागर मुन्तोडे यांच्यात थेट लढत होणार आहे.
निवडूणक निकालानतंर काय घडू शकते..
बहुमत असतानाही हातातून गेलेले सरपंच पद हे ना. विखे पाटील गटाच्या जेष्ठ व तरुण कार्यकर्त्याच्या चागलेचं जिव्हारी लागले आहे. पोट निवडणूकीत दोन्ही जागा विखे गटाने निवडून आणल्यास सरपंच पदावर २|३ बहुमताने अविश्वास ठराव दाखल करुन ना. विखे गटाचा सरपंच होऊ शकतो. तर दोन्ही जागापैकी एका जागेवर जरी ना. थोरात गटाने विजय मिळवला तर ना. विखे गटाचे स्वप्नं धुळीस मिळवून सरपंच पद प्रमोद बोद्रें राखणार की गमवणार ? हे लवकरचं स्पष्ट होणार असल्याने उद्या होणाऱ्या मतदानाकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.