◻️ प्रवरेची शैक्षणिक गुणवत्ता कायम
◻️ इंग्रजी माध्यमांच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के
◻️ २ हजार ४५४ विद्यार्थी पैकी २ हजार ३२३ विद्यार्थी उत्तीर्ण
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता बारावीचा निकालात १० महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विज्ञान ६, कला २, वाणिज्य शाखेतील १ तर किमान कौशल्य अभ्यासक्रम शाखेतील एका महाविद्यालयांचा समावेश आहे. प्रवरेच्या इंग्रजी माध्यमांच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहीती संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी दिली.
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या १७ कनिष्ठ महाविद्यालाने आपली निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी २ हजार ४५४ विद्यार्थी पैकी २ हजार ३२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचा कला शाखेच्या १२ महाविद्यालयाचा निकाल ८२.६८ टक्के लागला. प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी आणि कै. जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली या कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के लागला असून कला शाखेतून ४६२ पैकी ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेच्या मराठी माध्यमातील शाळांचा निकाल ९७.६५ टक्के लागला असून मराठी माध्यमातील छञपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पाथरे, पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय, विद्यालय बाभळेश्वर, डाॅ. बाबासाहेब आंबडेकर कनिष्ठ महाविद्यालय, भगवतीपूर या तीन तर इंग्रजी माध्यमातील प्रवरा पब्लीक स्कूल प्रवरानगर, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कुल प्रवरानगर, पद्यश्री डाॅ. विखे पाटील सैनिकी स्कुल, प्रवरानगर या तीनही महाविद्यालयांचा १०० टक्के लागला असून, १६३८ पैकी १६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याचे सौ. सरोदे म्हणाल्या.
वाणिज्य शाखेचा निकाल हा ९१.२४ टक्के लागला असून डाॅ. बाबासाहेब आंबडेकर महाविद्यालय भगवतीपूरचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून २७४ पैकी २५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर किमान कौशल्य शाखेचा निकाल ९६.२५ टक्के लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या कनिष्ठ महाविद्याल लोणी याचा निकाल १०० टक्के लागला असून ८० पैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमित विद्यापीठाचे कुलपती डाॅ. राजेंद्र विखे पाटील, सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी आभिनंदन केले.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वानीच केलेल्या सांघिक प्रयत्नामुळे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आपली निकालाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच उद्दीष्ट संस्थेने कायम ठेवले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यानी मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.