संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास वसंतराव मोतीयेळे यांची भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया) अंतर्गत असलेल्या नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (NSNIS) जलतरण सर्टिफिकेट कोर्स करीता निवड झाली आहे. अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.
सहा आठवडयांच्या या सर्टिफिकेट कोर्स चे प्रात्यक्षिक वर्ग हे बंगरुळू व कर्नाटक येथे होणार असून यामध्ये जलतरणाचे चारही स्ट्रोक्सचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण, शरीर रचना शास्त्र, बायोकेमिस्ट्री, बायोमैकेनिक्स, किंग्सिओलॉजी, कायनामॅटिक्स, फिजिओथेरपी इत्यादी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. यापूर्वी देखील डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांनी बॉक्सिंग आणि हेल्थ अँड फिटनेस या इव्हेंट्स मध्ये हा सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, सह सचिव डाॅ. भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, अतांत्रिक विभागाचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच अभय देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.